शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

मराठवाड्यात पावसाचा दगा; पेरणीनंतर सोयाबीनवर पंधरा दिवसांतच नांगर फिरविण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 14:56 IST

१०० हेक्टरवरील सोयाबीनचे पीक मोडले

ठळक मुद्देअंबाजोगाई तालुक्यातील प्रकार  शेतकऱ्यांना कडबा मिळेना

- चंद्रकांत उगले

पाटोदा म. (जि. बीड) : अगोदरच उशिरा बरसलेल्या पावसामुळे २ ते ५ ऑगस्टदरम्यान मोठ्या आशेने पेरण्या केल्या. मात्र, नंतर पावसाने दगा दिला, पिके जळू लागल्यामुळे अवघ्या पंधरा दिवसांत नांगर फिरविण्याची वेळ अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा म. महसूल मंडळातील १५ गावांतील शेतकऱ्यांवर आली आहे. 

जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यामुळे व पुढे पाऊस पडेल या आशेवर शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. परंतु पेरणीपासून आजपर्यंत कसलाही पाऊस न पडल्यामुळे सोयाबीनचे पीक वाळून गेले. त्यामुळे पाटोदा, ममदापुर, देवळा, धानोरा बु. धानोरा खु. अंजनपूर, अकोला, मुडेगाव, राडी, सुगाव, नांदडी, कुंबेफळ, माकेगाव, हिवरा खु. सो. बोरगाव या गावातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक मोडण्यास सुरवात केली आहे. या मंडळातील शेतकऱ्यांनी गतवर्षी पावसाअभावी रबीत हरभरा पिकाचीही पेरणी केली नव्हती. आता सोयाबीन पीक मोडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे होते नव्हते तेवढे पैसे संपल्यामुळे उदरनिर्वाह कसा करायचा, बँकेचे कर्ज कसे फेडायचे असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे आहेत. शेतकरी सुभास डिरंगे म्हणाले, १९७२ नंतर ही पहिलीच वेळ आहे. त्यावेळी जनांवरासाठी चारा होता, परंतू माणसांना खायला अन्न नव्हते. यंदा मी स्वत: २५ एकर सोयाबीन पेरली होती, त्यापैकी २० एकरातले पीक मोडले. शेतकरी बालासाहेब उगले म्हणाले, मला जसे कळते तसे याआधी असे कधीही झाले नव्हते. मी यावर्षी ३० एकर सोयाबीन पेरले होते त्यापैकी २२ एकरातील सोयाबीन मोडले आहे. दोन दिवसांत पाऊस न पडल्यास उर्वरित पीकही मोडावे लागणार आहे. 

शेतकऱ्यांना कडबा मिळेनाजनावरांना संभाळण्यासाठी चारा नाही. ज्वारीचा कडबा ५ हजार रुपये शेकडा भाव देऊनही मिळेना, काही शेतकरी पंढरपूरहून साडेचार हजार रुपये टन दराने ऊस खरेदी करून पशुधन जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही ऐपत नसल्यामुळे बाजारात विक्री करीत आहेत, तर काहींनी जनावरे मोकळे सोडून देण्याचे धोरण अवलंबिले आहे.

रबी पेरणीची वेळ जवळ आली पावसाअभावी  पिके करपू लागली आहेत. चाऱ्याचा प्रश्न गंभीर असून रबी पेरणीची वेळ जवळ आल्यामुळे शेतकरी सोयाबीन पीक मोडत आहेत. उद्या महसूल व कृषी विभागाचे अधिकारी पंचनामे करणार आहेत.      - ए. जी. गाडे, कृषी   सहायक, पाटोदा   (ता. अंबाजोगाई)

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊस