शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

घागरभर गुप्तधनातील सुवर्ण नाण्यांचा गावभर खणखणाट; पुरातत्व, महसूल विभागास पत्ताच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 12:50 IST

गुप्तधनाचं गुपित होणार का उघड?

- नितीन कांबळेकडा (बीड): सुर्डी गावात जानेवारीमध्ये एका जुन्या वाड्याचे खोदकाम करताना भिंतीच्या देवळीत घागरभर गुप्तधनातील सुवर्ण नाणी सापडली. याचा गावभर बोभाटा होऊन सोशल मीडियावर नाण्यांचा खणखणाट व्हायरल होत आहे. त्यानंतर पोलिसांनी गावात जाऊन पाहणी केली. पण पुरातत्व आणि महसूल विभागाची अद्याप काहीच हालचाल नाही. त्यांच्यापर्यंत अद्याप नाण्यांच्या खणखणाटाचा आवाजच गेला नाही की त्यांना अंधारात ठेवले गेले? हा प्रश्न चर्चेत आला असून या गुप्तधनाचे गुपित कधी उघड होणार याची उत्सुकता आहे. 

आष्टी तालुक्यातील सुर्डी गावात जानेवारी महिन्यात एका जुन्या वाड्याचे खोदकाम सुरू होते. दरम्यान, भिंतीच्या देवळीत एक घागरभर नाणे असल्याचे मजूरांना आढळून आले. सहा महीने गुप्तधन गुपीत राहिले. पण वाटाघाटीत बिघाडी झाल्याने एकाने तीन दिवसांपूर्वी याची माहिती आष्टी पोलिसांना दिली. पोलिसही गावात पोहचले, पाहणी करून  दोघांना चौकशीसाठी बोलावले. मात्र अद्याप ते पोलिसांत गेले नसल्याची माहिती आहे. केली. 

दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी सापडलेल्या गुप्तधनाचा गावभर बोभाटा झाला आहे. पण याची कसलीच कल्पना पुरातत्व आणि आणि महसूल विभागाला नाही. ही माहिती का दडवली गेली? हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. वास्तविक गुप्तधनाबाबत तक्रार आल्यानंतर पुरातत्व व महसूल विभागासोबत पाहणी करणे आवश्यक आहे. पण असे होताना दिसले नाही. यामुळेच पोलिस, महसूल आणि पुरातत्व अशा या तिन्ही विभागाने गावात जाऊन चौकशी करून ते गुप्तधन कोणाला सापडले? किती सापडले? ठेवले की विल्हेवाट लावली? याचा शोध घेणे आवश्यक आहे. तब्बल सहा महिन्यांच्यानंतर हे प्रकरण उघडकीस आल्यान याचा माग घेण्याचे मोठे आव्हान प्रशासकीय यंत्रणेसमोर उभे आहे.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीRevenue Departmentमहसूल विभागArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण