शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
4
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
5
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
6
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
7
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
8
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
9
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
11
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
12
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
13
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
14
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
15
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
16
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
17
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
18
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
19
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
20
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

उपद्रवी 'असिमन्टमॅटिक' कार्यकर्त्यांचा लवकरच बंदोबस्त; पंकजा मुंडेंचा इशारा

By सुमेध उघडे | Updated: October 24, 2020 19:24 IST

भविष्यात काम करतांना अशा असिमटोमॅटीक लोकांचा बंदोबस्त करणार

ठळक मुद्देमाझ्या भविष्याची चिंता तुम्ही करू नका.गोपीनाथराव मुंडे यांची शिदोरी माझ्या पाठीशी भक्कम

अंबाजोगाई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढविणारे लक्षणे नसलेले असिमन्टमॅटिक रुग्ण जसे समाजासाठी घातक ठरत आहेत. तसेच राजकारणात वरुन एक आणि आतून एक असलेले कार्यकर्ते घातक असतात. अशा उपद्रवींची पारख झाली असून या 'असिमन्टमॅटिक'  कार्यकर्त्यांचा लवकरच बंदोबस्त करण्यात येईल असा इशारा माजी मंत्री तथा भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी दिला. 

जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यानंतर पंकजा मुंडे यांच्या पक्षांतराचा मुद्दा सुद्धा पुन्हा चर्चेत आला आहे. पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार का? का आणखी कुठे जाणार? याबाबत विविध अंदाज वर्तविण्यात येत आहेत. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पक्ष आणि राजकारणापासून अलिप्त झाल्यापासून माजी मंत्री मुंडे भाजप सोडणार अशी चर्चा सुरु झाली होती. शनिवारी आ. नमिता मुंदडा यांच्यावतीने भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी मुंडे यांनी या सर्व चर्चेवर भाष्य करत त्यांच्या पक्षांतराच्या अफवा पसरविणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. मुंडे म्हणाल्या, कोरोनात असिमन्टमॅटिक असलेले रुग्ण जसे समाजात साथ फैलावासाठी घातक ठरतात. तसे राजकारणात 'असिमन्टमॅटिक' कार्यकर्तेही घातक आहेत. अशा कार्यकर्त्यांची चांगली पारख आपल्याला झाली आहे. भविष्यात काम करतांना अशा असिमटोमॅटीक लोकांचा बंदोबस्त कसा करायचा,  याचा विचार मी केला आहे असा इशाराही  मुंडे यांनी यावेळी उपद्रवी कार्यकर्त्यांना दिला. 

निर्णय घेण्यास मी खंबीर माझ्याबद्दल अफवा का पसरविल्या जातात हेच मला समजत नाही. आताही मी शिवसेनेत जाणार का कुठे जाणार? अशा अफवा पसरविल्या जात आहेत. माझ्या भविष्याची चिंता तुम्ही करू नका. मी स्वत: खंबीर आहे. माझ्या पक्षाने मला भरपूर दिलंय. तसेच गोपीनाथराव मुंडे यांची शिदोरी माझ्या पाठीशी भक्कम आहे. त्यामुळे तुम्ही माझी चिंता सोडा. अशा शब्दात अफवा पसरविणाऱ्यांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.  

लोकांपासून दुरावले नाही मी या निवडणुकीत पराभूत झाले असले तरी लोकांपासून दुरावले नाही. इंदिरा गांधींपासून अनेकांनी पराभवांचा अनुभव घेतला. यात मी नवीन नाही. जनतेशी जुळलेली नाळ तुटू देणार नाही. आता पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी दिल्याने पुन्हा जोमाने  कामाला सुरुवात केली असल्याचे त्यांनी सांगितले. मी मंत्री असतांना जिल्ह्यात विकास कामांसाठी भरघोस निधी आणला. मात्र, यांना कामे करता आले नाहीत. या सरकारमध्ये तो निधी वापस गेला. तुम्ही आमच्याच कामांचे नारळ फोडत आहात. काही तरी नवीन आणा. अशा शब्दात त्यांनी  नाव न घेता टीका केली. 

ऊसतोड कामगारांना २१ रुपये दरवाढ द्याऊसतोड कामगारांना २१ रुपये दरवाढ द्या. ते कामावर जातील. माझे ऊसतोड कामगार शेतकरी विरोधी नाहीत. तर शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आहेत. भविष्यात या कामगारांचे होणारे नुकसान कसं भरून काढायचं हे मी पाहते. मात्र, त्यांना संकटात टाकणार नाही. दसरा होताच कोयते घेऊन ते कामावर निघतील. मात्र, त्यांना २१ रुपये दरवाढ द्या, अशी मागणीही पंकजा मुंडे यांनी यावेळी केली.  

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाBeedबीड