शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
7
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
8
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
9
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
10
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
11
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
12
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
13
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
14
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
15
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
16
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
17
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
18
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
19
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
20
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...

काळोख्या अंधारात पुराच्या पाण्यात १२ तास अडकले; आजोबा-नातवाचा थरारक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 19:09 IST

Rain in Beed : पाण्याचा वेढा पडल्याने पडताच आजोबा व नातु बाभळीच्या झाडावर चढले.

-  पुरूषोत्तम करवामाजलगाव ( बीड ) :  माजलगाव धरणातुन ( Majalgaon Dam ) मोठ्या प्रमाणावर सिंदफना नदीपात्रात ( Sindhfana River ) पाणी सोडण्यात आले. पाण्याचा वेढा पडल्याने शेतातील गोठ्यात निवांतपणे बसलेल्या आजोबा व नातवास 12 तास झाडावर काढण्याची वेळ आली. तर त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या जवानांची बोट उलटली. सुदैवाने त्यातील एकाने झाडाला तर खाली लांब जावुन झाडाला लटकल्याने त्यांचे प्राण वाचले. ( The soldiers who came to the rescue were carried away; Grandfather and grandson rescued from the flood after 12 hours) 

माजलगाव धरणाच्या पायथ्याशी देवखेडा येथील शेतकरी रामप्रसाद गोविंद कदम आणि त्यांचा सात वर्षाचा नातू शिवप्रसाद सचिन कदम हे आपल्या गोठ्यावर थांबलेले होते . मंगळवारी दिवसभर धरण परिसरात जोरदार पाऊस झाल्याने धरणात पाण्याची मोठी आवक झाली. त्यामुळे धरणातुन सिंदफना नदीपात्रात 1 लाख 32 हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गोठ्याला पाण्याचा वेढा पडला. मंगळवारी दुपारी तीन वाजता पाण्याचा वेढा पडल्याने आजोबा व नातु बाभळीच्या झाडावर चढले. ही माहिती रामप्रसाद कदम यांनी आपल्या नातेवाईकांना दिली. त्यानंतर ही माहिती प्रशासनाला मिळतात तहसीलदार वैशाली पाटील व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे ते घटनास्थळी तळ ठोकून होते. सुरुवातीस काही मच्छीमार व भोई लोकांनी त्यांना काढण्याचा प्रयत्न केला असता पाणी जास्त असल्याने तेही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हते.

हेही वाचा - पुरात वाहून गेलेल्या माजी आमदाराच्या मुलाचा आणि नातवाचा मृतदेह सापडला

यानंतर तहसीलदार वैशाली पाटील यांनी परळी व बीड येथील एनडीआरएफ च्या जवानांना पाचारण केले. ते रात्री 10 वाजता पाण्यात उतरले. मात्र, आजोबा नातवापर्यंत पोहोचले असता त्यांची बोट उलटली. या बोटीत दोघे जण होते. यातील एकाने त्याच बाभळीला तर दुसऱ्याने गोशाळेजवळील एका झाडाचा आसरा घेत स्वतःचे प्राण वाचवले. वेगवान प्रवाहामुळे बचाव पथकाची बोट अडकलेल्यापर्यंत पोहचत नव्हती. यातच रात्रीचा अंधार, बाभुळीची झुडुपे त्यामुळेही मदत करताना अडचणी निर्माण होत होत्या. पहाटे तीनपर्यंत पाण्याचा वेग कमी झाल्यानंतर स्थानिक भोई पानबुडे यांनी आजोबा-नातू व बचाव पथकातील कर्मचाऱ्याला  सुखरूप बाहेर काढले.

हेही वाचा - - पावसाचे थैमान ! पुरात एकजण वाहून गेला; तर ९०० कोंबड्या दगावल्या- एकाच कुटुंबातील तिघींना सर्पदंश; दोन चिमुकल्या दगावल्या,आईची मृत्यूशी झुंज

टॅग्स :floodपूरBeedबीडRainपाऊस