शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

परळीत सौरऊर्जा प्रकल्प उभारणार; धनंजय मुंडेंच्या तारांकित प्रश्नाला मुख्यमंत्र्यांचे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 18:18 IST

परळीतील जुन्या औष्णिक विद्युत केंद्रात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील

मुंबई/परळी: परळी येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या बंद संचांच्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास सरकारकडून हिरवा कंदील देण्यात आला आहे, तर नव्या नवव्या संचाच्या उभारणीसंदर्भात पर्याय काढून सकारात्मक विचार केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मंगळवारी दिली. परंतु सध्या संच क्रमांक नऊची उभारणी करणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आमदार धनंजय मुंडे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, “औष्णिक विद्युत केंद्रातील बंद संच क्रमांक १ ते ५ च्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास मान्यता देण्यात येईल. तर संच क्रमांक ९ उभारणीसंदर्भात काही तांत्रिक अडचणी आहेत, मात्र त्याबाबत लवकरच व्यापक बैठक घेऊन पर्याय काढून सकारात्मक निर्णय घेतला जाईल.” आमदार धनंजय मुंडे यांनी परळी औष्णिक विद्युत केंद्रातील जुन्या बंद  संचांच्या जागेवर अधिक क्षमतेचा हरित ऊर्जा प्रकल्प उभारण्याची आणि विद्यमान संच क्रमांक ८ च्या जवळ नववा संच स्थापन करण्याची मागणी लावून धरली.  

परळीत आवश्यक पायाभूत सुविधा व जमीन उपलब्ध असल्याने हा प्रकल्प स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार देऊ शकतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “सौर ऊर्जा प्रकल्पास मान्यता देण्यात येईल. नवव्या संचाबाबतही सविस्तर बैठक घेऊन सर्व तांत्रिक बाबींचा विचार करून निर्णय घेण्यात येईल.”  परंतु संच  क्रमांक नऊ उभा करणे  परवडणारे नाही. 

धनंजय मुंडे यांचे सहा महिन्यांनंतर सभागृहात दमदार पुनरागमन महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर सुमारे सहा महिन्यांनंतर आमदार धनंजय मुंडे यांनी सभागृहात आपले पहिले भाषण करत अभ्यासपूर्ण, संयमी आणि मुद्देसूद मांडणीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी आज पुन्हा एकदा आपल्या खास शैलीत उपस्थिती लावली.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBeedबीडelectricityवीज