शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

सोळंके कारखान्याच्या कर्मचाऱ्यांवर ऐन दिवाळीत उपासमारीची वेळ; सहा महिन्यांचे वेतन थकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 19:56 IST

अनेक वर्षे कधीही कर्मचाऱ्यांचे वेतन थकलले नव्हते. परंतु मागील दोन वर्षांपासून या कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी आहेत.

माजलगाव : तेलगाव येथील लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन मागील सहा महिन्यांपासून थकले आहे. यामुळे ऐन दिवाळीत या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

तेलगाव येथे कै. सुंदरराव सोळंके यांनी ३२ वर्षांपूर्वी कारखान्याची उभारणी केली होती. मागील ३० वर्षे हा कारखाना सुरळीत चालला होता. अनेक वर्षे कधीही कर्मचाऱ्यांचे वेतन थकलले नव्हते. परंतु मागील दोन वर्षांपासून या कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी आहेत. मागील ६ ते ७ महिन्यांपासून येथील सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे.

मागील तीन-चार महिन्यांत वेगवेगळे सणउत्सव असतानादेखील या कर्मचाऱ्यांना वेतन मिळू शकलेले नाही. सध्या दिवाळीचा सण सुरू असतानादेखील या कर्मचाऱ्यांना केवळ दोनच महिन्यांचे वेतन देण्यात आले. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. सहा महिन्यांपासूनची उसनवार, इतरांची देणी द्यायची कशी अन् सण साजरा करायचा कसा? असा सवाल कर्मचारी, कामगार करीत आहेत. तसेच मागील दहा महिन्यांपासून वर्तमानपत्रांच्या जाहिरातीची बिलेदेखील थकलेली आहेत.

एकीकडे मागील ३२ वर्षांत या कारखान्याने एकही हंगाम गाळपाविना बंद ठेवलेला नव्हता. याचा विक्रम असल्याचे सांगत कारखान्याचे चेअरमन, संचालक मंडळ, कर्मचारी ढोल बडवत असतात. या कारखान्याकडे साखर, इथेनॉल, बग्यास, वीज निर्मिती मोठ्या प्रमाणात होत असताना यातून मिळणारा पैसा जातो कुठे असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

मुख्य कार्यकारी संचालकांचा हेकेखोरपणा?काही महिन्यांपूर्वी या कारखान्यात रुजू झालेले मुख्य कार्यकारी संचालक हे येथील कर्मचारी, शेतकरी, सभासदांच्या समस्या, त्यांच्या प्रश्नांचे निरसन करत नसून त्यांचीच बॉसगिरी सहन करावी लागते, अशा तक्रारी ऐकावयास मिळतात. यामुळे कर्मचारीदेखील वैतागले असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.

दोन महिन्यांचे वेतन केलेया कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे वेतन देणे मागील सहा महिन्यांपासून थकले होते. परंतु दोन दिवसांपूर्वीच दोन महिन्यांचे वेतन कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.- रवींद्र बडगुजर, मुख्य कार्यकारी संचालक, सोळंके सहकारी साखर कारखाना, तेलगाव.

टॅग्स :BeedबीडSugar factoryसाखर कारखानेPrakash Solankeप्रकाश सोळंके