शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

...तर प्रत्येक चौकात फाशीचे कार्यक्रम आयोजित करा; नोटबंदीवरून राऊत यांचा मोदींवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 18:21 IST

'नोटबंदी केल्यामुळे काळा पैसा येईल ही प्रधानमंत्री मोदी यांची पहिली घोषणा होती. मात्र देशात १ रुपया तरी आला का?'

परळी: 'नोटबंदी जर अयशस्वी ठरली तर मला भर चौकात फाशी द्या', असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. “ आता प्रत्येक चौकाचौकात लोकांनी जाहीर फाशीचा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे. लोकांनी पंतप्रधानांची इच्छा पूर्ण केली पाहिजे.'' अशी खळबळजनक प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी येथे दिली. त्यांनी महाप्रबोधन यात्रेनिमित्त बीडकडे जात असताना परळी येथे माध्यमांशी संवाद साधला. 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज बीड येथे गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहिली. यावेळी गोपीनाथ गडावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शुक्रवारी आरबीआयने देशातील २ हजार रुपयांची नोट बंद करण्यात आल्याचे जाहीर केले. ३० सप्टेंबरपर्यंत बँकेत २ हजारांच्या नोटा जमा करता येणार आहेत. या पार्श्वभूमीवर खा. राऊत यांना नोटबंदीवर प्रश्न विचारण्यात आला. यावेळी खा. राऊत म्हणाले, नोटबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचं नुकसान केलं, बेरोजगारी वाढवली, महागाई वाढवली, व्यापार उद्योग व लघुउद्योग बंद पडले. नोटबंदी केल्यामुळे काळा पैसा येईल ही प्रधानमंत्री मोदी यांची पहिली घोषणा होती. मात्र देशात १ रुपया तरी आला का?  दहशतवाद्यांना होणारा काळ्या पैशांचा पुरवठा बंद होईल असे ते म्हणाले होते मात्र काश्मीरला जाऊन बघा काय परिस्थिती आहे, असा सवाल खा. राऊत यांनी केला. 

प्रत्येक चौकात फाशीचे कार्यक्रम करानोटबंदी जर अयशस्वी ठरली तर मला भर चौकात फाशी द्या, असे प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटले होते. नोटबंदीमुळे देशात आता प्रत्येक चौकाचौकात लोकांनी जाहीर फाशीचा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे. लोकांनी पंतप्रधानांची इच्छा पूर्ण केली पाहिजे. मी या देशात किती लोकांचं नुकसान केलं हे त्यांना स्वतःलाच कळायला पाहिजे, अशी सणसणीत टीका खा. राऊत यांनी केली. तसेच गोपीनाथ मुंडे असते तर शिवसेना - भाजपा युती तुटली नसती असेही ते म्हणाले.

आज बीड येथे अंधारे- राऊत एकाच मंचावर बीड येथे ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा कार्यक्रम आहे. यावेळी ठाकरे गटाचे दोन फायरब्रांड नेते खा. संजय राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारे एकाचा मंचावर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी बीडकडे परळीमार्गे जात असताना खासदार संजय राऊत व उपनेत्या सुषमा अंधारे यांचे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसवतीने वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. येथील राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात शिवसेनेच्या परळी शाखेच्यावतीने खा. राऊत यांचे जेसीबीतून फुले उधळून जोरदार स्वागत करण्यात आले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSushma Andhareसुषमा अंधारेBeedबीडNarendra Modiनरेंद्र मोदीDemonetisationनिश्चलनीकरण