शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून धनंजय मुंडेंनी परळीतील सभा केली रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 14:41 IST

बीड लोकसभा मतदारसंघातील परळी शहरात गुरुवारी सायंकाळी गणेशपार या नावाजलेल्या भागात विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांची रात्री आठ वाजता जाहीर सभा होती.

परळी : लोकसभा निवडणुकीसाठी सध्या रणसंग्राम सुरु आहे. बीड लोकसभा मतदारसंघातील परळी शहरात गुरुवारी सायंकाळी गणेशपार या नावाजलेल्या भागात विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांची रात्री आठ वाजता जाहीर सभा होती. यावेळी सभेला अनेकांनी हजेरी लावली होती. मात्र, यासभेला धनंजय मुंडे आले आणि त्यांनी चक्क व्यासपीठावर येऊन ही सभा रद्द केल्याचे जाहीर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. 

यावेळी धनंजय मुंडे यांनी सभेतील संचलन कर्त्याच्या हातातला माईक हातात घेत मला माफ करा मी आज येथे भाषण करायला आलेलो नाही. पुन्हा कधीतरी नक्कीच येईन. तुमच्याशी बोलण्यापेक्षा मला आज एका गोष्टीचे वाईट वाटत आहे की या भागातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक सच्चा कार्यकर्ता वैजनाथ दहातोंडेचे काही तासांपूर्वीच दुःखद निधन झाले आहे, असे त्यांनी सांगितले.

वैजनाथ हा एक तरुण आणि सर्वसामान्यांसाठी तळमळीने काम करणारा माझा चांगला मित्र होता. पक्ष कोणताही असला तरी शहरातील सामाजिक चळवळ जिवंत राहण्यासाठी अशा कार्यकर्त्यांचे मोठे योगदान असते. वैजनाथ आणि त्याचे कुटुंबीय दुःखात असताना मला सभा घेणे योग्य वाटत नाही, म्हणून आपण सर्वजण वैजनाथला श्रद्धांजली वाहूया असे सांगितले. यावेळी श्रद्धांजली वाहिल्यानंतर सभा संपल्याचे जाहीर करत सर्वजण आपल्या पुढच्या कार्यक्रमासाठी निघून गेले. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या या संवेदनशीलतेची परळीकरांमध्ये चांगलीच चर्चा होती.

यावेळी सोमनाथ अप्पा हालगे,बाजीराव धर्माधिकारी,वाल्मीक अण्णा कराड, जाबेर खान पठाण, दिपकराव देशमुख, प्रा.डॉ.विनोद जगतकर, सूर्यभान मुंडे, शरद मुंडे, माणिकभाऊ फड, संजय आघाव, डॉ.सुरेश चौधरी,वैजनाथ बागवाले,सोपान ताटे, अनिल अष्टेकर, गोपाळ आंधळे,नितीन रोडे, गोविंद कुकर, जयप्रकाश लड्डा, जयराज देशमुख, आर.आर.देशपांडे प्रभाकरराव देशमुख, बाळासाहेब देशमुख, चेतन सौन्दळे,सुरेश टाक, बाशीत भाई,प्रताप देशमुख, नारायनदेव गोपणपाळे,रमेश मस्के,अर्चना रोडे,पल्लवी भोयटे, अन्नपूर्णा जाधव, उमाताई धुमाळ, गोदावरीताई पोखरकर, भारत ताटे, रतन आदोडे, विठ्ठल अदोडे आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेbeed-pcबीडBeedबीडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक