शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये हातकडीसह पळालेला चोरटा अर्ध्या तासात पुन्हा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 00:45 IST

बीड : चोरीच्या मोटारसायकलसह रंगेहाथ पकडण्यात आलेल्या चोरट्यास वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता त्याने पोलिसाच्या हातास झटका देऊन हातकडीसह पलायन केले. ही घटना सोमवारी रात्री जिल्हा रुग्णालयात घडली. मात्र, पोलिसांनी तातडीने कारवाई करत अर्ध्या तासात पुन्हा या चोरांना ताब्यात घेतले.केज पोलीस ठाण्यात १६ जून रोजी मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. ...

बीड : चोरीच्या मोटारसायकलसह रंगेहाथ पकडण्यात आलेल्या चोरट्यास वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता त्याने पोलिसाच्या हातास झटका देऊन हातकडीसह पलायन केले. ही घटना सोमवारी रात्री जिल्हा रुग्णालयात घडली. मात्र, पोलिसांनी तातडीने कारवाई करत अर्ध्या तासात पुन्हा या चोरांना ताब्यात घेतले.केज पोलीस ठाण्यात १६ जून रोजी मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. सदरील मोटारसायकल ज्ञानेश्वर कृष्णनाथ सुरवसे (रा. देवगाव, ता. वडवणी) याने चोरली असून तो सध्या गावाकडे असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे १७ जून रोजी दुपारी केज ठाण्याचे सहा. फौजदार गुजर आणि पो.ना. सचिन आरदवाड यांनी चोरट्यास त्याच्या खापरवाडी शिवारातील शेतातून चोरीच्या मोटारसायकलसह ताब्यात घेतले.

१८ जून रोजी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. केज येथे न्यायालयीन कोठडीतील आरोपींना ठेवण्याची सोय नसल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपी सुरवसेला बीड येथील कारागृहात दाखल करण्यासाठी आरदवाड त्याला घेऊन बीडला आले. रात्री ८.३० वाजताच्या सुमारास सुरवसेची एमसीआरपूर्व वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्यास जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

त्या ठिकाणी पोलीस नाईक आरदवाड हे आरोपी तपासणी रजिस्टरवर नोंद करण्यात गुंग असल्याची संधी साधून ज्ञानेश्वर सुरवसे याने त्यांच्या हातास जोराचा झटका देऊन हातकडीसह रुग्णालयातून पलायन केले. ही माहिती नियंत्रण कक्षास दिली. त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासातच शिवाजीनगर भागातील एका हॉस्पिटलच्या पाठीमागे त्याला पुन्हा जेरबंद केले. दरम्यान, सुरवसे याच्यावर बीड शहर पोलिसात कलम २२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

ज्ञानेश्वरचे वडील कीर्तनकारज्ञानेश्वर सुरवसे याचे वडील कीर्तनकार आहेत. शिवाय त्यांचे एकत्र कुटूंब असून घरात ५० च्या वर सदस्य आहेत. या सर्वांपासून ज्ञानेश्वर नेहमीच वेगळा राहत असे. घरात चांगले संस्कार असताना केवळ वाईट संगतीने तो चोरीच्या मार्गाला लागल्याचे सांगण्यात आले. त्याचे घरचे त्याला भेटण्यासाठी सुद्धा आले नसल्याचे सूत्रांकडून समजते.

दुसऱ्याच ज्ञानेश्वरला त्रासदेवगावमध्ये ज्ञानेश्वर उर्फ माऊली सुरवसे हे माजी सरपंच आहेत. त्यांच्या नावाप्रमाणेच या चोरट्याचे नाव आहे. ज्ञानेश्वर सुरवसेला चोरीच्या गुन्ह्यात पकडल्याचे समजताच माजी सरपंच ज्ञानेश्वर यांनाच फोन सुरू झाले. परंतु ते आपण नसल्याचा खुलासा त्यांना प्रत्येकासमोर करावा लागला. ‘सेम’ नावाचा त्रास त्यांना चांगलाच सहन करावा लागला.

 

टॅग्स :BeedबीडCrimeगुन्हाPoliceपोलिसMarathwadaमराठवाडा