शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सख्ख्या बहिणींमधील वाद विकोपाला, दगडफेकीत सहा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 00:19 IST

कौटुंबिक वादाच्या कारणावरून दोन सख्य्या बहिणींचा वाद विकोपाला गेला. मंगळवारी सकाळपासूनच दोन्ही कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद सुरु होता. शाब्दिक चकमकीचे रुपांतर जोरदार हाणामारीत झाले.

ठळक मुद्देबीड शहरातील गांधीनगर भागात तुफान दगडफेक : कौटुंबिक कारणावरून वाद; जखमींमध्ये पोलीस कर्मचारी

बीड : कौटुंबिक वादाच्या कारणावरून दोन सख्य्या बहिणींचा वाद विकोपाला गेला. मंगळवारी सकाळपासूनच दोन्ही कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद सुरु होता. शाब्दिक चकमकीचे रुपांतर जोरदार हाणामारीत झाले. दोघींच्या कुटुंबियांनी एकमेकांवर दगडफेक करत जबर मारहाण केली. ही घटना मगंळवारी सायं ६ ते ६.३० वाजण्याच्या दरम्यान बीड शहरातील पेठ बीड भागात असलेल्या गांधीनगरमध्ये घडली.रेणुका शिंदे आणि मीरा गुंजाळ अशी दोन्ही बहिणींची नावे आहेत. त्या दोघीही विवाहित असून शहरातील पेठबीड भागात गांधीनगरात शेजारी-शेजारी राहतात. त्या दोघींमध्ये कौटुंबिक कारणावरुन सतत वादावादी होत असे. मंगळवारी सकाळीच पुन्हा एकदा या वादाला सुरुवात झाली होता. त्यानंतर दोघीही परस्परविरोधी तक्रारी घेऊन पोलीस ठाण्यात आल्या होत्या. त्यांच्यातील वाद उफाळलेला असल्याने पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला. दोघीही सख्ख्या बहिणी असल्याने हा वाद समजुतीने मिटविण्याचे ठरले होते. मात्र, सायंकाळी सहा वाजता या वादाचे रुपांतर तुफान हाणामारीत झाले. एकमेकांवर दगडफेक झाली. यामध्ये किरण गुंजाळ, अमर गुंजाळ व अन्य गंभीर जखमी झाले. त्या सर्वांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एकाची प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठवण्यात आले आहे. पेठ बीड ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. या घटनेची माहिती मिळताच पेठ बीड पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीBeed policeबीड पोलीस