शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले;धरण भरल्याने बीडसह लातूर,उस्मानाबाद जिल्हे सुखावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 9:15 AM

Rain In Beed : बीडसह लातूर, उस्मानाबाद जिल्ह्याचा मुख्य जलस्रोत मांजरा धरण भरल्याने दिलासा

- दीपक नाईकवाडेकेज : बीडसह उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील बहुतांशी भागाचा प्रमुख जलस्त्रोत असणारा मांजरा प्रकल्प मंगळवारी (दि.२१ ) दुपारी तुडुंब भरल्याने कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसाने धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली. त्यामुळे आज बुधवारी (दि.२२) सकाळी ६ वाजता धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. 

मंजर धरणाची साठवण क्षमता २२४ दलघमी आहे. काल सकाळपर्यंत या धरणात २२३.६२५ दलघमी साठा होता. त्यानंतर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने मंगळवारी दुपारी १ वाजता उजव्या कालव्यातून १.२७ प्रतीसे.घ.मी. वेगाने पाण्याचा विसर्ग सरू करण्यात आला होता. मात्र, दुपारनंतर मुसळधार पाऊस झाल्याने धरणात पाण्याची आवक वेगाने वाढली आणि बुधवारी पहाटेपर्यन्त धरणात २२५.५ दलघमी पाणीसाठा झाला. त्यामुळे सकाळी ६ धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून प्रती सेकंद १४९.८० घनमीटर वेगाने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला. सहा वर्षांच्या दुष्काळानंतर २०१६ साली झालेल्या मुसळधार पावसाने या धरणाचे धरणाचे दरवाजे उघडण्याचा योग आला होता. त्यानंतर अपवाद वगळता नियमितपणे हे धरण प्रतिवर्षी पूर्ण क्षमतेने भरत आहे. यंदाही निसर्गाने भरभरून दान दिल्यामुळे सलग तिसऱ्या वर्षी हे धरण तुडुंब भरले असून दरवाजे उघडण्याचा सुखावह प्रसंग आज अनुभवयास मिळाला असून सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

टॅग्स :BeedबीडManjara Damमांजरा धरणRainपाऊस