शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

चोऱ्यांच्या विरोधात मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 23:55 IST

शहरात गेल्या काही महिन्यापासून सतत लहान-मोठ्या चोरीच्या घटना घडत आहेत, यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच या चोऱ्यांचा तपास येथील पोलिसांना लागत नसल्याने याच्या विरोधात निषेध मूक मोर्चा पोलीस ठाण्यावर काढण्यात आला.

गेवराई : शहरात गेल्या काही महिन्यापासून सतत लहान-मोठ्या चोरीच्या घटना घडत आहेत, यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच या चोऱ्यांचा तपास येथील पोलिसांना लागत नसल्याने याच्या विरोधात निषेध मूक मोर्चा पोलीस ठाण्यावर काढण्यात आला.यावेळी शहरातील व्यापा-यांनी आपली दुकाने दोन तास बंद ठेवून मोर्चात सहभागी झाले होते. तसेच या मोर्चात महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.काही महिन्यांपासून शहरातील विविध भागात चो-यांचे व दरोड्याचे प्रमाण वाढले आहे. याचा तपास येथील पोलिसाला लागत नसल्याने नागरिक व महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याच विरोधात आ.लक्ष्मण पवार यांच्या नेतृत्वाखाली येथील पोलीस ठाण्यावर शहरातील नागरिक, व्यापारी, महिला, डॉक्टर, वकिलांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सकाळी ११ वाजता निषेध मोर्चा काढण्यात आला.या मोर्चाची सुरूवात येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सुरू झाली. हा मोर्चा शास्त्री चौक, बाजार रोड मार्गे बाजार तळावर थांबून तेथे काही महिलांच्या वतीने येथील उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांना ठाण्यात निवेदन देण्यात आले.त्यानंतर बाजार तळावर नागरिकांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी नागरिकांनी व महिलांनी सांगितले की, आम्हाला पोलीस ठाणेच नको, चोºयाचा तपास लावा, आम्ही आमचे रक्षण करण्यासाठी सक्षम आहोत पण आम्हाला बंदुका द्या, महिलांना दिवसा चालताना भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षांपासून तालुक्यातील एका ठाण्यातून दुसºया ठाण्यात व एकाच जागेवर ठाण मांडून बसलेल्या पोलिसांना तात्काळ हटवा, अशा शब्दात नागरिकांनी रोष व्यक्त केला.या मोर्चेक-यांच्या मागण्या आम्ही पोलीस अधीक्षक, महानिरीक्षकांना देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी शहरातील नागरिक, व्यापारी, महिला, वकील, डॉक्टरसह अनेकजण उपस्थित होते. यावेळी पोलिसांतर्फे बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.मागणी : ठाणे नको, बंदुकीचे परवाने द्याशहरात एक दिवसाला दहा-दहा चो-या होत आहेत. मात्र याकडे येथील पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत आहे. एकाही चोरीचा तपास लागत नाही.त्यामुळे नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण पसरले असून, येथे पोलीस ठाणेच नको आम्हाला बंदुकीचे परवाने द्या, आम्ही आमचे संरक्षण करण्यासाठी सक्षम आहोत, असे आ.लक्ष्मण पवार यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडtheftचोरीBeed policeबीड पोलीसMorchaमोर्चा