शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

श्रावण सोमवार आणि विनायक चतुर्थीचा संयोग; वैद्यनाथ मंदिर सजवले फुलांनी, भक्तांची अलोट गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 14:21 IST

वैद्यनाथ मंदिरात तगडा पोलिस बंदोबस्त, भाविकांसाठी दर्शन रांग आणि विशेष पास रांग सुविधा

- संजय खाकरेपरळी: देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिगाच्या दर्शनासाठी पहिल्या श्रावण सोमवारी  भाविकांची अलोट गर्दी झाली आहे . मंदिरात विविध फुलांची मनमोहक सजावट करण्यात आले असून ध्वनीकरणाद्वारे. ॐ नमः शिवाय ची धून जप सुरू करण्यात आला आहे. मध्यरात्री बारा वाजल्यापासून दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली आहे. हर हर महादेव, प्रभू वैद्यनाथ भगवान की जय, ओम नमः शिवाय  जयघोष करीत  सकाळी दहा वाजेपर्यंत हजारो शिवभक्तांनी प्रभुवैद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेतले. देशभरातून भाविक दर्शनासाठी परळीत आले आहेत. प्रभू श्री वैद्यनाथ मंदिर व मंदिरातील इतर ज्योतिर्लिंगाचे प्रतिकृती असलेल्या मंदिरातही भाविकांची गर्दी झाली. परळी व परिसरातील महादेवाचे  मंदिरही गजबजले आहेत.

विनायक चतुर्थी व श्रावण सोमवार असा योग आल्याने श्री वैद्यनाथ मंदिरात भाविकांची संख्या वाढली आहे. महिलांनी तांदळाची पहिली शिवमुठ व बिल्वपत्र अर्पण करून प्रभू श्री वैद्यनाथ भगवानाचे दर्शन घेतले. वैद्यनाथ मंदिरात श्रावण सोमवारच्या अनुषंगाने महिला व पुरुष अशी  धर्मदर्शन रांग व पासधारक अशा स्वतंत्र तीन रांगा लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे हजारो शिवभक्तांचे दर्शन शांततेत व सहज होत आहे.  वैद्यनाथ मंदिर परिसरात साडेतीनशे पोलीस अधिकारी, कर्मचारी, महिला पोलिस, होमगार्ड, राज्य राखीव दल, असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. धर्मदर्शन रांगेमध्ये दोन तासाच्या आत दर्शन होत आहे तर पासच्या रांगेमध्ये एक तासाच्या आत दर्शन होत असल्याचे भाविकांनी सांगितले. श्रावण सोमवारी आमदार व माजी मंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने श्री वैद्यनाथ मंदिरात 25 क्विंटल झेंडू ,गुलाब ,निशिगंधा व अष्टर  या फुलांनी मनमोहक सजावट करण्यात आली आहे. आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे त्यामुळे मंदिर झगमगटत आहे. 

वैद्यनाथ मंदिर परिसरातील प्रसाद साहित्याच्या दुकानावर भाविकांची गर्दी आहे .श्री वैद्यनाथ मंदिर भाविकांच्या गर्दीने फुलले आहे. रविवारी रात्री महाराष्ट्र, उत्तर प्रदेश ,कर्नाटका ,आंध्र प्रदेश येथील भाविकांनी दर्शन घेतले .पहिल्या  श्रावण सोमवारी राज्य व राज्यातून भाविक दर्शनासाठी परळी नगरीत आले आहे. श्रावण महिन्यानिमित्त श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने श्री वैद्यनाथ मंदिरात ध्वनिकर्णद्वारे ओम नमः शिवाचा धून जप 24 तास चालू आहे. त्यामुळे वातावरण भक्तीमय झाले आहे.

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलBeedबीड