शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

श्रावण सोमवार - लाखो भाविकांनी घेतलं परळीच्या वैद्यनाथांचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 17:13 IST

श्रावण सोमवारच्या दर्शनासाठी रात्री 12 पासूनच भक्तांची रीघ सुरू झाली, सकाळ नंतर गर्दी तुफान वाढली

ठळक मुद्देश्रावण सोमवारच्या दर्शनासाठी रात्री 12 पासूनच भक्तांची रीघ सुरू झाली, सकाळ नंतर गर्दी तुफान वाढली

बीड/परळी - "हर हर महादेव, प्रभू वैद्यनाथ भगवान की जय"चा मोठा जयघोष करीत हजारो भाविकांनी दुसऱ्या श्रावण सोमवारी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. दुपारपर्यंत एक लाख भाविकांनी वैद्यनाथाचे दर्शन घेतले. आज दुसरा श्रावण सोमवार असल्याने पहिल्या श्रावण सोमवार पेक्षा भाविकांची गर्दी दुप्पट होती, वैद्यनाथास आज शिवमूठ तीळ महिलांनी वाहिले तर पुरुष भक्तांनी बेलपत्र वाहिले. 

श्रावण सोमवारच्या दर्शनासाठी रात्री 12 पासूनच भक्तांची रीघ सुरू झाली, सकाळ नंतर गर्दी तुफान वाढली, मंदिरात महिला व पुरुषांची स्वतंत्र रांग होती. तसेच पास धारकांसाठी ही स्वतंत्र रांग लावण्यात आलेली आहे, वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्यावर लोखंडी बॅरिकेट्स मधून धर्मदर्शनची सुविधा करण्यात आली आहे. हर हर महादेव चा जयघोष  केला जात होता, दुपारी आमदार विनायक मेटे यांनी दर्शन घेतले, वैद्यनाथ मंदिराच्या रोडवर विविध महिला बचत गटाचे स्टॉल उभारण्यात आलेले आहे. पेढे, प्रसाद साहित्य घेण्यासाठी भाविकांची गर्दी होती  मंदिर परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली आंबाजोगाईच्या अप्परजिल्हा पोलीस अधीक्षक स्वाती भोर, परळी चे पोलीस निरीक्षक देविदास शेळके, बाळासाहेब पवार, महिला पोलीस अधिकारी अनुसया माने, सुरेखा धस यांच्यासह इतर पोलीस तैनात होते.  

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलBeedबीडparli-acपरळी