शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

जरांगेंना पाठिंबा देऊन ओबीसींचे नुकसान करणाऱ्या नेत्यांना घरचा रस्ता दाखवा: लक्ष्मण हाके

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 15:10 IST

मनोज जरांगे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांचे पाठबळ: लक्ष्मण हाके यांचा आरोप

- संतोष स्वामीदिंद्रुड (बीड): मनोज जरांगे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शरद पवार यांनी पाठबळ देत ओबीसींचे फार मोठे नुकसान केल्याचा आरोप ओबीसी आरक्षण नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केला. तळागाळातील ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षित पदांवर डोळा ठेवत ओबीसी कुठेच नेतृत्व करणार नाही यासाठी शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांच्या माध्यमातून खेळी रचली आहे. मात्र, ही खेळी यशस्वी होऊ देणार नसल्याचा इशारा देखील हाके यांनी शुक्रवारी दिला. तसेच जरांगेंना पाठिंबा देऊन ओबीसींचे नुकसान करणाऱ्या नेत्यांना घरचा रस्ता दाखवा, असे आवाहन हाके यांनी केले. ते धारूर तालुक्यातील चाटगाव येथे आयोजित ओबीसी मेळाव्यात बोलत होते.

हाके पुढे म्हणाले, ओबीसींचे नुकसान करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांनी जरांगे यांना आणले आहे. चौथी नापास अडाणी जरांगे यांना संविधानाचा अभ्यास नाही. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षणाचा घाट आपण यशस्वी होऊ देणार नाहीत. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षणाच्या आम्ही समर्थनार्थ आहोत मात्र ओबीसी समाजावर मराठ्यांचे अतिक्रमण कदापी होऊ देणार नाहीत. जरांगे यांच्या मागणीस पाठिंबा दिलेल्या आमदारांना, नेत्यांना ओबीसी समाजाने घरी बसवावे, असे आवाहन हाके यांनी केले. 

याप्रसंगी नवनाथ वाघमारे म्हणाले की, मनोज जरांगे यांना संविधानाचा अभ्यास नाही, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याखाली बसून ओबीसी नेते छगन भुजबळ यांना शिवराळ भाषा वापरणाऱ्या जरांगे यांचा डाव आपण यशस्वी होऊ देणार नाहीत. योद्धा शरण येत नसेल तर बदनाम केल्या जातो, या युक्तीप्रमाणे प्रा. लक्ष्मण हाके यांच्यावर खोटे आरोप जरांगेसह काही जणांनी केले. दम असेल तर समोरासमोर वार करून बघा, असे आव्हान वाघमारे यांनी दिले. 

यावेळी माधव निर्मळ म्हणाले की, ज्या गोपीनाथ मुंडे यांनी बीड जिल्ह्यासाठी अफाट असे काम केले त्यांची कन्या पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. जातीपातीच्या राजकारणामुळे बीड जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले असून ओबीसी समाजाचे हे दुर्दैव आहे. भविष्यात पंकजा मुंडे व धनंजय मुंडे सांगतील त्याचप्रमाणे आपण समाजासाठी काम करणार असल्याचे निर्मळ यांनी मनोगतात स्पष्ट केले. 

ओबीसी कार्यकर्ते बंडू खांडेकर, सतीश बडे यांनी बीड जिल्ह्यातील ओबीसींवर होत असलेल्या अन्यायाचा पाढा प्रा लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्यासमोर वाचला. दीपक सांगळे यांनी सूत्रसंचालन, कृष्णा केकान यांनी प्रस्ताविक केले. संतोष केकान, सरपंच महादेव केकान, उपसरपंच धर्मराज सांगळे, गोविंद केकान यांच्यासह तरुणांची मोठी उपस्थिती मेळाव्यात होती.

टॅग्स :laxman hakeलक्ष्मण हाकेBeedबीडManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलOBC Reservationओबीसी आरक्षण