शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

हवेत गोळीबार झाला अन् दरोडेखोर आल्यापाऊली माघारी फिरले; ग्रामस्थांनी तिघांना पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 16:49 IST

या प्रकरणी सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ताब्यातील तिघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

- नितीन कांबळे

कडा ( बीड) : आज पहाटे तीन वाजेच्या दरम्यान दरोड्याच्या तयारीत आलेल्या सहा जणांनी घरचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत सोनेनाणे काढून द्या, आरडाओरड करू नका अशी, धमकी देत धिंगाणा घातला. मात्र, घरमालकाने समयसूचकता दाखवत परवानाधारक रायफलमधून हवेत गोळीबार केला. यामुळे दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. दरम्यान, गस्तीवरील ग्रामस्थांच्या सहकार्याने पोलिसांनी तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून तिघे पसार झाली आहेत. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध शुक्रवारी आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आष्टी तालुक्यातील किन्ही व केरूळ परिसरात दरोड्याच्या घटना घडल्याने पोलिस ॲक्शन मोडवर आले होते. तर काही गावातील ग्रामस्थांनी गस्त सुरू केली. पोलिसही डोळ्यात तेल घालून दरोडेखोरांच्या मागावर होते. शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान चोभानिमगांव येथील सतीश झगडे यांच्या घरी कोयता, लोंखडी गज, करवत घेऊन सहा जणांनी दरोड्याचा प्रयत्न केला. आरडाओरडा न करता घरातील रोकड, दागिने हवाली करण्याची धमकी दरोडेखोरांनी दिली. मात्र, झगडे यांनी प्रसंगावधान राखत परवानाधारक रायफलमधून हवेत गोळीबार केला. गोळीबार होताच दरोडेखोर माघारी फिरल्याने अनर्थ टळला.

दरम्यान, जिवाच्या आकांताने दुचाकीवरून सुसाट निघालेल्या दरोडेखोरांना भवरवाडी रस्त्यावर गस्तीवरील ग्रामस्थांनी अडवले. यावेळी तिघांनी तेथून पळ काढला तर तिघांना ग्रामस्थांनी पकडले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तिन्ही दरोडेखोरांना ताब्यात घेतले. सतीश झगडे याच्या फिर्यादीवरून शुक्रवारी अहमदनगर जिल्ह्यातील रोहित शंकर मोरे, किरण गुलाब मोरे, अजय सुखदेव शिंदे, अक्षय पवार, विशाल बर्डे, गुलाब मोरे या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ताब्यातील तिन्ही दरोडेखोरांना आष्टी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास आष्टीचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडRobberyचोरी