धक्कादायक ! बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने तरुणाची आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 07:28 PM2020-10-21T19:28:24+5:302020-10-21T19:32:04+5:30

आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 

Shocking! Young man commits suicide by threatening to file false rape case | धक्कादायक ! बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने तरुणाची आत्महत्या 

धक्कादायक ! बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने तरुणाची आत्महत्या 

googlenewsNext
ठळक मुद्देआत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत घटनेचा उल्लेख त्यामुळे हा सर्व प्रकार उघडीस आला.

बीड : पाटोदा तालुक्यातील खडकवाडी येथे बलात्कार केल्याचा खोटा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने एका तरुणाने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी उघडकीस आली. 

नवनाथ रघुनाथ भिताडे (३६, रा. खडकवाडी ता.पाटोदा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. नवनाथची पत्नी संगीता हिच्या फिर्यादीनुसार, गल्लीत राहणाऱ्या एका महिलेसह पिंपळगाव टप्पा (ता. पाथर्डी जि. अहमदनगर) येथील एकाने मिळून नवनाथवर अत्याचार केल्याचा आळ घातला होता. तसेच याप्रकरणी खोटा गुन्हा दाखल करण्याचा व बदनामीची धमकी दिली होती. त्यामुळे नवनाथ हा चिंतेत होता. त्यातूनच त्याने ७ ऑक्टोबर रोजी शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. 


आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नवनाथने सर्व घटनेचा उल्लेख केलेला होता. त्यामुळे हा सर्व प्रकार उघडीस आला.संबंधित महिलेसह तिच्या माहेरकडील व्यक्तीने त्रास दिल्याचे नमूद केले होते. यावरुन अंमळनेर पोलीस ठाण्यात आत्मत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 

धारुरमध्ये घडला असाच प्रकार
विनयभंग केल्याचा खोटा गुन्हा दाखल केल्यामुळे धारूर शहरात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार ताजा असतानाच ही घटना उघडकीस आली आहे.

Web Title: Shocking! Young man commits suicide by threatening to file false rape case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.