शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! परळीच्या वैद्यनाथ महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकडून एक कोटी रुपये कॅपिटेशन फी उकळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 16:41 IST

इयत्ता ११ वी आणि १२ वी विज्ञान विषयाच्या वर्गासाठी विद्यार्थी आणि पालकांकडून प्रतिवर्षी ५० हजार रुपये कॅपिटेशन फिस घेण्यात आली.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांकडून जमा केलेले शुल्क सुरुवातीला संस्थेच्या खात्यात जमा करण्यात आले त्यानंतर लोकनेते गोपीनाथराव मुंडे अकॅडमी या नावाच्या खात्यात फीस जमा करण्यात आली

परळी : येथील वैद्यनाथ महाविद्यालयामध्ये प्रतिव्यक्ती शुल्काच्या (कॅपिटेशन फी) नावाखाली प्रत्येक विद्यार्थ्याकडून ५० हजार रुपयांचे शुल्क उकळल्याप्रकरणी संस्थेच्या संचालकांवर महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम १९८७ आणि कलम ३ आणि ७ चे उल्लंघन केल्याप्रकरणी परळी शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

परळीतील जवाहर एज्युकेशन सोसायटीचे संचालक भास्कर चाटे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, २०१८ पासून जवाहर एज्युकेशन सोसायटी संचलित वैद्यनाथ कनिष्ट महाविद्यालय, परळी येथे इयत्ता ११ वी आणि १२ वी विज्ञान विषयाच्या वर्गासाठी विद्यार्थी आणि पालकांकडून प्रतिवर्षी ५० हजार रुपये कॅपिटेशन फिस घेण्यात आली. वैद्यनाथ महाविद्यालय परिसरातील मुलींच्या वस्तीगृहांच्या इमारतीत शिकवणी वर्ग विद्यमान अध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, सचिव दत्तात्रय इटके, कोषाध्यक्ष सुरेश अग्रवाल व प्राचार्य डॉ. रामचंद्र इप्पर यांच्यातर्फे चालवले जात आहेत. 

सदरील शिकवणी वर्ग हे आॅगस्ट २०१८ साली सुरू केले असून तत्पुर्वी २३ फेब्रुवारी २०१८ रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे अकॅडमीला संस्थेच्या खात्यातून ८ लाख रुपये व १७ एप्रिल २०१८ रोजी २ लाख रुपये असे एकूण १० लाख रुपये देण्यात आले. विद्यार्थ्यांकडून जमा केलेले शुल्क सुरुवातीला संस्थेचे बँक खाते क्र.१०१२२१०३७६०७ मध्ये २२ लाख ३५ हजार ८४१ रुपये जमा केले. वैद्यनाथ बँकेतच लोकनेते गोपीनाथराव मुंडे अकॅडमी या नावाने उघडलेल्या खाते क्रं. १०१२३१००४४८८ या खात्यात १ सप्टेंबर २०१८ पासून विद्यार्थ्यांकडून वसूल केलेले शुल्क ८३ लाख ६१ हजार ३४४ रुपये जमा केले. दोन्ही बँक खात्यात मिळून १८ आॅगस्ट २०१८  ते १४ जून २०१९ पर्यंत  १ कोटी ६ लाख रुपये जमा केले आहेत. 

वसतिगृहात घेतली शिकवणीजवाहर एज्युकेशन सोसायटी संचलित वैद्यनाथ महाविद्यालय, परळी, संचालक मंडळ, संस्थाचालक तथा अध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, सचिव दत्तात्रय  इटके, कोषाध्यक्ष सुरेश अग्रवाल व प्राचार्य  डॉ. रामचंद्र  इप्पर यांनी २०१८ पासून इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान विषयाच्या वर्गासाठी विद्यार्थी व पालकांकडून प्रतिवर्षी ५० हजार रुपये कॅ पिटेशन फी घेऊन वैद्यनाथ महाविद्यालय परिसरातील मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीत शिकवणी वर्ग चालवल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थीCrime Newsगुन्हेगारीBeedबीड