शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! गर्भवती महिलेने अत्याचारानंतर बदनामीपोटी पेटवून घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 16:32 IST

प्रसुतीसाठी माहेरी आलेल्या एका गर्भवती महिलेवर गावातीलच एका तरूणाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

बीड : प्रसुतीसाठी माहेरी आलेल्या एका गर्भवती महिलेवर गावातीलच एका तरूणाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यानंतर आपली बदनामी होईल, या भीतीने महिलेने अंगावर रॉकेल टाकून स्वत:ला पेटवून घेतले. यामध्ये पीडित महिला ७६ टक्के भाजली असून सध्या जिल्हा रूग्णालयात ती मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात नराधमाविरोधात अत्याचार व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

बीड तालुक्यातील सिरस पारगाव हे पीडितेचे माहेर आहे. ८ जानेवारी २०१७ रोजी पीडितेचे लग्न अ.नगर जिल्ह्यातील एका तरूणासोबत झाले. त्याच्यापासून ती गर्भवती राहिली. सध्या पीडिता ही सात महिन्यांची गर्भवती असून प्रसुतीसाठी ती काही दिवसांपूर्वीच माहेरी आली होती.  ४ मे रोजी रात्री पीडितेची आई ही कार्यक्रमासाठी उमरद येथे गेली होती. त्यामुळे पीडिता ही घरात लाईट बंद करून झोपली. हीच संधी साधून गावातीलच विष्णू तुकाराम नवले हा घरात शिरला व गर्भवती महिलेवर त्याने अत्याचार केला. हा प्रकार पीडितेला सहन झाला नाही. आपली बदनामी होईल, या भीतीने तिने ६ मे रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घरात कोणी नसल्याचे पाहून अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. 

हा प्रकार बाजूच्या महिलांनी पाहिल्यानंतर पाणी टाकून तिला विझविण्यात आले. तात्काळ पीडितेला जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पीडिता ही ७६ टक्के भाजली असून सध्या ती मृत्यूशी झुंज देत आहे. पीडितेच्या जबाबावरून विष्णू नवले याच्यावर अत्याचार आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर हे करीत आहेत. 

आरोपीला तात्काळ ठोकल्या बेड्यागुन्हा दाखल होताच उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांनी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक तयार करून आरोपीच्या अटकेसाठी रवाना केले. सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, भागवत शेलार, रमेश दुबाले, खय्युम खान यांनी विष्णूच्या शिरूर तालुक्यातील औरंगपुर परिसरात सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास मुसक्या आवळल्या.

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हाfireआगArrestअटकWomenमहिलाBeed policeबीड पोलीस