शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक : मुंबईहून आलेल्या मानसिक रुग्णाचा बीडमध्ये क्वारंटाईन असताना मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 15:49 IST

मयताला मुंबई प्रवासाचा इतिहास आहे. लक्षणे नसली तरी इतिहास पाहून त्याचा स्वॅब घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देबीड जिल्ह्यात बाधितांची संख्या ४७

बीड : चार दिवसांपूर्वी मुंबईहून आलेल्या ४२ वर्षीय मानसिक रुग्णाचा  क्वारंटाईनमध्ये असताना घरातच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी बीड तालुक्यातील राजुरी येथे घडली आहे. त्याला प्रवासाचा इतिहास असल्याने स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत पाठविला आहे. रात्री उशिरापर्यंत त्याचा अहवाल येईल. 

राजुरी येथील एक कुटूंब मुंबईला वास्तव्यास आहे. कोरोनाच्या भितीने ते २० मे रोजी गावी आले होते. यामध्ये दोन महिला व दोन पुरूषांचा समावेश होता. या सर्वांना गावाच्या बाहेर क्वारंटाईन करण्यात आले होते. यात ४२ वर्षीय व्यक्तीला मानसिक आजार होता. त्याला औषधोपचारही चालू होते. आरोग्य विभागाच्या पथकाकडून त्यांना भेटी देण्यासह तपासणी केली जात होती. यात कोणालाही लक्षणे दिसली नाहीत, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय राऊत यांनी सांगितले.

दरम्यान, सायंकाळच्या सुमारास या व्यक्तीची काहीच हालचाल होत नसल्याचे पाहून इतर नातेवाईकांनी सरपंचाला संपर्क केला. त्यांनी रुग्णवाहिका बोलावून जिल्हा रुग्णालयात आणले. येथे तपासून त्याला मृत घोषित केले. त्याचा अगोदरच मृत्यू झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. जिल्हा  शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी या घटनेचा आढावा घेतला आहे. 

स्वॅब घेतला; अहवालाची प्रतिक्षामयताला मुंबई प्रवासाचा इतिहास आहे. लक्षणे नसली तरी इतिहास पाहून त्याचा स्वॅब घेण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत त्याचा स्वॅबचा अहवाल येईल, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. 

जिल्ह्यात बाधितांची संख्या ४७जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४७ झाली आहे. यात एक कोरोनामुक्त तर एकाचा मृत्यू झाला आहे. सहा रुग्ण उपचारासाठी पुण्याला गेले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत ३९ बाधितांवर उपचार सुरू आहेत. सोमवारी आणखी नव्याने कोरोना संशयित असलेल्या ५६ लोकांचे स्वॅब घेतले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीडDeathमृत्यू