शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! तळणेवाडी कालव्यात सहा महिन्यांच्या बालिकेचे शव आले वाहत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 17:05 IST

बुधवारी सायंकाळी नागरिकांना आले निदर्शनास

गेवराई :- तालुक्यातील तळणेवाडी जवळील जायकवाडीच्या उजव्या कालव्यात एका सहा महिन्यांच्या बालिकेचे शव वाहत आल्याची धक्कादायक घटना बुधवारी ( दि. ११ ) सायंकाळी उघडकीस आली. बालिकेची ओळख अद्याप पटली नसून या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  

तालुक्यातील तळणेवाडी शिवारातील उजव्या कालव्यात सध्या मोठ्या प्रमाणात पाणी आहे. बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास कालव्यातून एका बालिकेचे शव वाहत येत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी लागलीच पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक युवराज टाकसाळ व पोलीस संतोष गाडे,सुशेन पवार यांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला. बालिकेचे वय अंदाजे ६ महिने असून रंग सावळा आहे. अंगामध्ये पांढरा व निळ्या रंगाचा फ्रॉक, दोन्ही हातामध्ये काळ्यापांढर्‍या रंगाच्या मन्याचे मनगटे आहेत. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज टाकसाळ हे करित आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीडWaterपाणी