अंबाजोगाई : पहाटेच्या वेळी फिरण्यासाठी गेलेल्या व्यक्तीस अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरूवारी (दि.३१) पहाटे अंबाजोगाई-साखर कारखाना मार्गावर झाला. हा अपघात एवढा भीषण होता की त्या व्यक्तीचे कंबरेपासून दोन तुकडे झाले आहेत. दत्ता लक्ष्मण ठोंबरे (वय ४२, रा. टिळक नगर, अंबाजोगाई) असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे. टिळक नगर भागात त्यांची पिठाची गिरणी आहे. गुरूवारी पहाटे पाच वाजता दत्ता ठोंबरे नित्यनेमाप्रणाने माॅर्निंग वाॅकला गेले होते. अंबाजोगाई-साखर कारखाना रोडवर आरटीओ कार्यलाय वळणाच्या १०० मी. अलीकडे त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात दत्ता ठोंबरे यांच्या शरीराचे कंबरेपासून दोन तुकडे झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक वाहन घेऊन पसार झाला. या मार्गावर माॅर्निंग वाॅक करणाऱ्या लोकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. सहा. फौजदार सोनेराव बोडखे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अंबाजोगाई शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.
धक्कादायक ! वाहनाच्या धडकेत माॅर्निंग वाॅकला गेलेल्या व्यक्तीच्या शरीराचे झाले दोन तुकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 18:11 IST
Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत माॅर्निंग वाॅकला गेलेल्या व्यक्तीचा मृत्यू
धक्कादायक ! वाहनाच्या धडकेत माॅर्निंग वाॅकला गेलेल्या व्यक्तीच्या शरीराचे झाले दोन तुकडे
ठळक मुद्देअपघातानंतर चालक वाहन घेऊन पसार झाला.