शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! बीडमध्ये १५ महिन्यांत काढल्या ६५१ गर्भपिशव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 14:28 IST

The business of removing the uterus is again started : गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सकांची परवानगी बंधनकारक आहे.

ठळक मुद्देगर्भाशय काढण्याचा धंदा डोके वर काढतोय

- सोमनाथ खताळ

बीड : बीड जिल्ह्यातील गर्भपिशवी काढण्याचे प्रमाण अद्यापही थांबलेले नाही. गरज नसतानाही काही महिलांना परवानगी घेण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे पाठविले जात असल्याचे दिसले. तपासणी केल्यानंतर गरज नसल्याचे सिद्ध झाले. याच अनुषंगाने माहिती घेतली असता मागील १५ महिन्यांत जिल्हाभरात तब्बल ६५१ महिलांची गर्भपिशवी काढण्यात आली आहे. विशेष म्हणजे सरकारीपेक्षा खासगीतील आकडेवारी दुप्पट असल्याचे दिसते.

गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सकांची परवानगी बंधनकारक आहे. असे असतानाही खासगी डॉक्टरांनी पाठविल्यानंतर सरकारी डॉक्टरही शस्त्रक्रिया करण्यास योग्य असल्याचा अहवाल देत आहेत; परंतु स्वत: जिल्हा शल्यचिकित्सकांनी तपासल्यानंतर शस्त्रक्रियेची गरज नसल्याचे सिद्ध होते. कमी वय व औषधोपचारावर ठीक होत असल्याचा मुद्दा ठेवून सीएसकडून परवानगी नाकारली जात आहे. त्यामुळे जे सीएस करतात, तेच सरकारी डॉक्टर का करत नाहीत? असा सवाल उपस्थित होत आहे. यावरून मिलीभगत असल्याचा संशय व्यक्त होत असून गर्भाशय काढण्याचा धंदा पुन्हा डोके वर काढत असल्याचे दिसत आहे.

पूर्ण तपासणी केली जाईल परवानगी दिलेल्या लोकांचीच नोंद ठेवली जाते. नाकारलेल्यांची यापुढे नोंद ठेवली जाईल. खासगीतून आलेल्यांना सरकारी डॉक्टरांनी तपासून माझ्याकडे शिफारस केली तरी मी पुन्हा तपासणी करतो. यात मला गरज नसल्याचे वाटल्यानेच परवानगी नाकारली. आता या प्रकरणात लक्ष घालून पूर्ण तपासणी केली जाईल.- डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड.

अशी आहे आकडेवारीखासगीतील शस्त्रक्रियाबीड १८९परळी ८४आष्टी ६केज ६

सरकारीतील शस्त्रक्रियास्वाराती, अंबाजोगाई २३२जिल्हा रुग्णालय ४उपजिल्हा रुग्णालय परळी ४उपजिल्हा रुग्णालय केज १खासगीतील एकूण शस्त्रक्रिया ४१०सरकारीतील एकूण शस्त्रक्रिया २४१

टॅग्स :BeedबीडBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडWomenमहिला