शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

उसतोडणी करताना शेतात मानवी सांगाडा आढळल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 19:41 IST

तालुक्यातील रामपिंपळगाव शिवारातील शेतात ऊस तोडणीचे काम सुरू आहे.

माजलगाव (बीड) : तालुक्यातील रामपिंपळगाव शिवारात आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास विखुरलेल्या अवस्थेत मानवी सांगाडा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, चार महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका ६३ वर्षीय व्यक्तीचा हा सांगाडा असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

तालुक्यातील रामपिंपळगाव शिवारात आबासाहेब चाळक यांच्या शेतात ऊस तोडणीचे काम सुरू आहे. या दरम्यान आज सकाळी मजुरांना उसाच्या पाचोटात मानवी कवटी निदर्शनास आली. घाबरलेल्या मजुरांनी सदरील बाब शेतमालकाला सांगितली. याची खबर पोलिसांना देण्यात आली. तात्काळ दाखल होत पोलिसांनी तिथे पाहणी करत इतर अवयव शोधून काढली. त्याचबरोबर कपडे आणि चप्पलही सापडली.

दरम्यान, पोलिसांना 25 ऑगस्ट 2022 रोजी राधाकिसन बाबुराव जगदाळे ( 63, रा.हरकीलिमगाव) या बेपत्ता व्यक्तीशी साम्य आढळून आले. पोलिसांनी जगधने यांच्या नातेवाईकांना बोलावून सांगाडा , कपडे, चप्पल दाखवले. यावरून सांगाडा राधाकिसन बाबुराव जगदाळे यांचा असल्याचे त्यांचा मुलगा तुळशीराम राधाकिसन जगदाळे यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी सांगाडा अंबाजोगाईतील शासकीय इस्पितळात रवाना केला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश ईधाते, पोलीस शिपाई विलास खराडे करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड