शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
3
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
4
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
5
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
6
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
7
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
8
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
9
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
10
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
11
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
12
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
13
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
14
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
15
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
16
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
17
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
18
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
19
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
20
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...

बीडजवळ शिवशाही बसला लागली आग; सर्व प्रवासी सुखरूप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 13:33 IST

औरंगाबादच्या दिशेने प्रवाशी घेऊन जाणाऱ्या शिवशाही बसला सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास हिरापूर जवळ आग लागली.

बीड :  औरंगाबादच्या दिशेने प्रवाशी घेऊन जाणाऱ्या शिवशाही बसला सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास हिरापूर जवळ आग लागली. गाडीतून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्यांनी गाडी थांबवत आगीवर वेळीच नियंत्रण मिळवले. यातील सर्व प्रवासी सुखरूप असून त्यांना दुसऱ्या बसमधून औरंगाबादला पाठविण्यात आले आहे. 

या गाडीमधील नवगण राजुरी येथील प्रवासी मनोज थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड आगारातून औरंगाबादच्या दिशेने निघालेली शिवशाही बस ((MH- 06 - BW 0646 ) सकाळी ११. १५ वाजेला हिरापूर जवळ आली असता त्यामधून धूर निघू लागला. ही बाब चालकाच्या लक्षात आल्याने त्याने लागलीच बस रस्त्याच्या बाजूला घेतली. यानंतर बसमधील अग्निशमन यंत्र वापरत चालक व प्रवाशांनी आगीवर नियंत्रण मिळवले. बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असून त्यांना इतर बसमधून औरंगाबाद दिशेने पाठविण्यात आले आहे. चालकाच्या प्रसंगावधानामुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने पुढील मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून प्राथमिक अंदाजानुसार गाडीतील एसी यंत्रणेतील बिघाडामुळे आग लागली असावी. 

टॅग्स :fireआगShivshahiशिवशाहीstate transportराज्य परीवहन महामंडळBeedबीडAurangabadऔरंगाबादBus Driverबसचालक