शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
2
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
3
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
4
चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
5
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
7
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
8
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? कोण मेले कोणासाठी..?
9
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
10
ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
12
शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
13
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांची टीका
14
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
15
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
16
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
17
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
18
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
19
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
20
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात ७७ ठिकाणी शिवरायांची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 00:09 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यासाठी जिल्हाभरातील शिवप्रेमी सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात ७७ ठिकाणी शिवरायांची मिरवणूक ढोलताशाच्या गजरात निघणार आहे.

ठळक मुद्देशिवप्रेमी सज्ज : शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये अडीचशे लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यासाठी जिल्हाभरातील शिवप्रेमी सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात ७७ ठिकाणी शिवरायांची मिरवणूक ढोलताशाच्या गजरात निघणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दंगा करणाऱ्या व गुन्हेगारी पार्श्वभूमी असणा-या तब्बल अडीचशे लोकांवर बीड पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा जिल्हाभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षीही हा सोहळा पार पाडण्यासाठी नागरिकांनी नियोजन केले आहे. बीड शहरात सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने दुपारी २ वाजता मिरवणूक काढली जाणार आहे. यासह जिल्हाभरात मिरवणुका काढण्यात येणार आहेत. यासाठी बीड पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त नियूक्त केला आहे. गतवर्षी गोंधळ घालणारे व ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, अशांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. तसेच अडीचशे लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती बीड पोलिसांकडून देण्यात आली आहे.दरम्यान, शिवजयंतीनिमित्त मिरवणूक आणि इतर कार्यक्रम सुरळीत होण्यासाठी आयोजन समित्यांनी नियोजन केले आहे. या समित्यांचे स्वयंसेवक देखील बंदोबस्तकामी असलेल्या पोलिसांना मदत करणार आहेत. जयंतीनिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.मिरवणुका अन् रॅलीजिल्हा विशेष शाखेच्या माहितीनुसार जिल्ह्यात ७७ ठिकाणी मोठ्या मिरवणुका निघणार आहेत.तसेच ९ ठिकाणी दुचाकी आणि ४ ठिकाणी पायी रॅली काढण्यात येणार आहे. त्याचा बंदोबस्तही आहे.फेटे, झेंडे असा काहीसा रूबाब शिवप्रेमींचा असणार आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी’ अशा गगनभेदी घोषणांनी शहर दणाणून जाणार आहे.बीडमध्ये पहिल्यांदाच शाळेची मिरवणूकशिवजयंतीनिमित्त बीड शहरात प्रथमच टिष्ट्वंकलिंग स्टार स्कूलने मिरवणूक काढली. ढोल पथकाच्या प्रात्यक्षिकाने प्रेक्षकांना जिंकले. या मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी शिवरायांसह मावळ्यांची वेशभूषा साकारली होती. शहरातील प्रमुख मार्गावरुन निघालेल्या या मिरवणुकीतील विद्यार्थ्यांचे नागरिकांनी कौतुक केले.असा असेल जिल्ह्यातील बंदोबस्तपोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे यांच्यासह ५ पोलीस उपअअधीक्षक, २३ पोलीस निरीक्षक, ७५ सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, ८०० पोलीस कर्मचारी, १०० महिला कर्मचारी, पुरूष होमगार्ड ३५०, महिला होमगार्ड १०० राज्य राखीव दलाची १ तुकडी व सीआरपीएफच्या ४ तुकड्या, तसेच नियंत्रण कक्षात १३ अधिकारी, ७६ पोलीस कर्मचारी, १ राज्य राखीव दलाची तुकडी, जलद प्रतिसाद पथक १, आरसीपी तुकडी १ असा तगडा बंदोबस्त जिल्ह्यात असणार आहेत. तसेच ठिकठिकाणी फिक्स पॉर्इंट लावण्यात आले आहेत. यासह स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथक, जिल्हा विशेष शाखा हे सुद्धा बंदोबस्तासाठी रस्त्यावर दिसणार आहेत. प्रत्येक हालचालीवर नियंत्रण कक्षातून नजर ठेवली जाणार आहे.

टॅग्स :BeedबीडShivjayantiशिवजयंतीBeed policeबीड पोलीसReligious programmeधार्मिक कार्यक्रम