शिवजन्मोत्सवात ४१ सर्वधर्मीय जोडप्यांचे शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 12:07 AM2020-02-20T00:07:50+5:302020-02-20T00:08:21+5:30

येथील शिवसेवाभावी संस्थेचे बाळासाहेब ताकट व लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या वतीने बुधवारी शिवजन्मोत्सवात ४१ सर्वधर्मीय जोडप्यांचा सामुहिक विवाह संपन्न झाला.

Shivjayanti celebrates the happy couple of all religious couples | शिवजन्मोत्सवात ४१ सर्वधर्मीय जोडप्यांचे शुभमंगल

शिवजन्मोत्सवात ४१ सर्वधर्मीय जोडप्यांचे शुभमंगल

Next
ठळक मुद्देमाजलगावात ५०१ दाम्पत्यांच्या हस्ते शिवपूजन : शिवसेवाभावी संस्था, सोळंके सहकारी कारखान्याचा उपक्रम

माजलगाव : येथील शिवसेवाभावी संस्थेचे बाळासाहेब ताकट व लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या वतीने बुधवारी शिवजन्मोत्सवात ४१ सर्वधर्मीय जोडप्यांचा सामुहिक विवाह संपन्न झाला. यावेळी शिवजन्मोत्सवात ५०१ जोडप्यांच्या हस्ते शिवपूजन झाले.
मागील सहा वर्षापासून शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधुन सर्वधर्मीय सामूहिक विवाहाचे आयोजन करण्यात येते. यापूर्वी झालेल्या सामूहिक सोहळ्यात २३४ विवाह करण्यात आले होते. व-हाडी मंडळींची जेवणाची व्यवस्था जय महेश मॉलचे शिवप्रसाद भुतडा व राम जगताप यांनी व वाटप व्यवस्था जगदीश साखरे मित्रमंडळ यांनी सांभाळली. विवाहस्थळी राजवाड्याचे भव्य स्टेज उभारण्यात आले होते. सायंकाळी पाच वाजता ढोलताशाच्या गजरात संभाजी चौकातून परन्या निघुन हनुमान मंदिरापर्यंत एकाच रंगाच्या ४१ गाडीने लग्नस्थळी आला. सर्व नवरदेव, नवरींना सारख्या रंगाचे कपडे व दीड हजार वºहाडींना भगवे फेटे बांधण्यात आले. याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन आ.प्रकाश सोळंके, बाळासाहेब ताकट, कार्यकारी संचालक एम. डी. घोरपडे, कारखान्याचे सचिव सुरेश लगड, अशोक पाटील यांनी वºहाडी मंडळीचे स्वागत केले. यावेळी बांधकाम सभापती जयसिंग सोळंके, समाज कल्याण सभापती कल्याण आबुज, आदिनाथ नवले, बाबुराव पोटभरे, चंद्रकांत शेजुळ, माहेश्वरी सभेचे जिल्हा अध्यक्ष गोविंद बजाज, सुरेश बुधवंत, जयदत्त नरवडे, शिवप्रसाद भुतडा, राम जगताप, भागवत भोसले, राहुल लंगडे आदि उपस्थित होते.
तृतीयपंथियांनी वेधले लक्ष!
या विवाह सोहळ्याचे आयोजक बाळासाहेब ताकट यांनी वंचित घटक म्हणून काही तृतीयपंथियांना या सोहळ्याचे नेतृत्व करण्याचा मान दिला होता. त्यानुसार प्रथमच विवाह सोहळ्यात हजेरी लावणाऱ्या तृतीय पंथियांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या हस्ते षोडषोपचार पूजा होऊन विवाह पार पडले. यावेळी तृतीयपंथियांनी दिलेल्या सन्मानाबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त केले. हा विवाह सोहळयाची लिमका बुक आॅफ रेकॉडर््ससाठी नोंद घेण्यात आले असल्याची माहिती संयोजक बाळासाहेब ताकट यांनी दिली.

Web Title: Shivjayanti celebrates the happy couple of all religious couples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.