शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
4
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
5
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
6
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
7
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
8
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
9
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
10
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
11
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
12
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
13
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
14
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
15
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
16
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
17
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
18
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
19
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
20
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?

शिवजन्मोत्सव हर्षोल्हासात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 00:09 IST

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मंगळवारी जिल्हाभरात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.

बीड- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मंगळवारी जिल्हाभरात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय जय जय भवानी, जय जय जय शिवाजी’, ‘तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ, जय शिवराय’ अशा गगनभेदी घोषणांनी आसमंत दणाणून गेला. जिल्हाभरात शिवप्रेमींनी सकाळपासूनच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा आणि पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर रॅली, मिरवणुकीसह सामाजिक उपक्रम राबवून हा उत्सव साजरा करण्यास सुरूवात केली. यंदा प्रथमच शिवजयंतीनिमित्त विक्रमी रक्तदान करण्यात आले. तर बीड, गेवराई, धारुरमध्ये निघालेल्या मिरवणूक आणि कलाप्रकारांनी शिवप्रेमींच्या डोळ्याचे पारणे फेडले. तर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.दरम्यान, सोमवारी रात्री पासूनच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ अभिवादनासाठी शिवप्रेमींची गर्दी दिसून आली. मंगळवारी सकाळी शासकीय महापुजा करण्यात आली. जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, सीईओ अमोल येडगे, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, जि.प.सदस्य संदीप क्षीरसागर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर, पोनि घनश्याम पाळवदे, शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक, शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब डावकर, नगरसेवक अमर नाईकवाडे यांच्यासह राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, संघटना आदी क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, महिला, मुली, तरूण, नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. त्यानंतर दिवसभर शहरात ठिकठिकाणी दुचाकी रॅली काढून लक्ष वेधले. दुपारी ३ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मुख्य मिरवणुकीला सुरूवात झाली. वीर पत्नींच्या हस्ते महामानवाला पुष्पहार अर्पन करण्यात आला. यावेळी माजी सैनिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. सुभाष रोडमार्गे मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आली. रात्री उशिरापर्यंत गर्दी होती.चित्तथरारक कसरतींनी अंगावर रोमांचपंजाब राज्यातील गटका, मणीपूरचा थांगता, तामिळणाडूचा सिलम्बंब सारखे पारंपरिक कलाप्रकार मिरवणुकीत सादर केले. या कलाकारांनी एकापेक्षा एक सरस चित्तथरारक कसरतील सादर केल्याने पाहणाऱ्यांच्या अंगावर रोमांच आले. प्रत्येकाने हा क्षण नजरेत कैद केला. तसेच अनेकांनी मोबाईलमध्येही शुटींग करून घेतली.महिलांसाठी विशेष व्यवस्थासुभाष रोडवर महिला, मुलींसह लहान मुलांना कलाकारांच्या चित्तथरारक कसरती पाहता याव्यात, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. गॅलरीही बनविण्यात आली होती. याठिकाणी संयोजकांसह पोलिस बंदोबस्त तैनात होता.वीर पत्नींसह माजी सैनिकांचा सन्मानबीडमधील मुख्य मिरवणूकीत राधाताई चंद्रकांत नागरगोजे, जयश्री राजेंद्र उबाळे, विद्याताई सानप या विर पत्नींसह प्रकाश शहाणे, बाळू तुपे, शिवराम उबाळे, भागवत तांदळे, बाळू उबाळे, शिंदे, घोडके, बळीराम राख, बारीकराव उबाळे, वसंत उबाळे, हनुमान उबाळे, मधूकर तांदळे, संतराम उबाळे, गोवर्धन उबाळे, मसू ससाणे या माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. तसेच मिरवणूकीपूर्वी शहीद जवांनाना श्रद्धांजली अर्पन करण्यात आली.

टॅग्स :ShivjayantiशिवजयंतीSocialसामाजिक