शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात जयदत्तअण्णांचा अश्वमेध; सर्वत्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 11:19 PM2019-09-28T23:19:08+5:302019-09-28T23:19:20+5:30

खांद्यावर विकासाची जबाबदारी घेऊन निघालेल्या जयदत्तअण्णा क्षीरसागर यांचा हा अश्वमेध असून बीड विधानसभेवर भगवा फडकणार असल्याचा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी व्यक्त केला.

Shiv Sena's Jayalalithaa Ashwamedh at Balekile; Response everywhere | शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात जयदत्तअण्णांचा अश्वमेध; सर्वत्र प्रतिसाद

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात जयदत्तअण्णांचा अश्वमेध; सर्वत्र प्रतिसाद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : विधानसभा मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, शिवसैनिकांनी जीवाचे रान करून शिवसेनेचा झंझावात निर्माण केला आहे, जयदत्त क्षीरसागरांच्या रुपाने या मतदार संघाला विकासाची दृष्टी असणारे लोकप्रतिनिधी लाभले आहेत. खांद्यावर विकासाची जबाबदारी घेऊन निघालेल्या जयदत्तअण्णा क्षीरसागर यांचा हा अश्वमेध असून बीड विधानसभेवर भगवा फडकणार असल्याचा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी व्यक्त केला.
बीड विधानसभा मतदार संघामध्ये भगवे चैतन्य निर्माण झाले आहे, शिवसैनिक पक्षाने टाकलेली जबाबदारी आणि दिलेला शब्द प्राणापेक्षा जास्त सांभाळत असतो. शिवसैनिकांनी निवडणूक हाती घेतली आहे. गावागावात शिवसैनिक जन चळवळ निर्माण करत आहे, बीड विधानसभा मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या मतदार संघात गुंडगिरीला थारा नाही. गप्पा मारणाऱ्या आणि फसवणाऱ्यांना लोळवण्याचे काम शिवसैनिकांनी केले आहे.
आता या बालेकिल्ल्यात जयदत्त क्षीरसागर यांच्या रूपाने विकासाचा दृष्टीकोन असणारा उमेदवार मैदानात उतरत आहे, जयदत्त क्षीरसागर यांचा झंझावात निर्माण झाला आहे, आता बोलघेवडे गुंडगिरीच्या जोरावर शिवसैनिकांसमोर आव्हान निर्माण करण्याचा आव आणत आहेत. जयदत्त क्षीरसागर यांचा निघालेला अश्वमेध बीड मतदार संघावर भगवा फडकवून विजयश्री खेचून आणणार आहे, असा विश्वास जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांनी व्यक्त केला.
शिवसेनेचा झंजावात बीड मतदार संघात असून मतदारांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. ज्येष्ठांसोबतच तरुणाईही प्रचाराला लागली आहे. विकासाची दूरदृष्टी असलेला आणि बारामहिने जनसंपर्कात असल्यामुळे जयदत्तअण्णांचे पारडे जड आहे.

Web Title: Shiv Sena's Jayalalithaa Ashwamedh at Balekile; Response everywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.