शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

शिवसेनेचे उमेदवार जयदत्तअण्णा असल्यामुळे विरोधकांना थारा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 23:40 IST

पालसिंगण परिसर शिवसेनेला साथ देणारा आहे. पुर्वीपासून जयदत्त आण्णा यांनादेखील येथून मदत झाली आहे. यावेळी शिवसेनेचे उमेदवार आण्णा स्वत: असल्यामुळे विरोधकांना मत मागण्यासाठी कुठेही थारा मिळणार नाही. राज्याच्या विधानसभेत बीडचा उमेदवार सर्वाधिक मताने निवडून येणार असे मत विलास महाराज शिंदे व्यक्त केले.

ठळक मुद्देविलास महाराज शिंदे : बालाघाटावरील गावांत कार्नर बैठकांमधून संवाद

बीड : पालसिंगण परिसर शिवसेनेला साथ देणारा आहे. पुर्वीपासून जयदत्त आण्णा यांनादेखील येथून मदत झाली आहे. यावेळी शिवसेनेचे उमेदवार आण्णा स्वत: असल्यामुळे विरोधकांना मत मागण्यासाठी कुठेही थारा मिळणार नाही. राज्याच्या विधानसभेत बीडचा उमेदवार सर्वाधिक मताने निवडून येणार असे मत विलास महाराज शिंदे व्यक्त केले.शिवसेना-भाजपा, रिपाई, रासप, रयत क्रांती महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ पालसिंगण, सफेपूर, चांदेगाव, जेबापिंप्री येथे झालेल्या कॉर्नर बैठकीत ते बोलत होते.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, शिवसेना जिल्हाध्यक्ष कुंडलिक खांडे, अरूण डाके, अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, दिनकर कदम, नितीन धांडे, सुशिल पिंगळे, सागर बहीर, झुंजार धांडे, भारत जगताप आदी उपस्थित होते.विलास महाराज म्हणाले की, शांत, संयमी आणि माणूस जपणारे नेतृत्व म्हणून आण्णांकडे पाहिले जाते. आपण शिवसैनिकांनी जागरूकपणे आणि खंबीरपणे आण्णांच्या मागे उभे राहून एक नंबरचे मतदान धनुष्यबाणावर करावे, असे आवाहन त्यांनी केले.कुंडलीक खांडे म्हणाले की, एक पुतण्या गेला म्हणून काय झाले हजारो पुतणे आण्णांच्या बरोबर आहेत. आण्णा नावातच एक मोठा पक्ष आहे. या परिसरात एकही गाव असे नाही की जिथे आण्णांनी काम केले नाही. आण्णा पुन्हा मंत्री होणार आहेत त्यामुळे आपल्या भागाच्या विकासाला गती येईल. त्यामुळेच येणाऱ्या युती सरकारमध्ये अण्णांना भरघोस मतांनी निवडून पाठवा.भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे म्हणाले, राज्याच्या राजकारणात अण्णा ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर चांगल्या मंत्रीपदाची जबाबदारी येणार आहे. भाजपासह मित्रपक्ष आण्णांच्या सोबत आहेत. ही निवडणूक म्हणजे पोरखेळ नाही. त्यामुळे आपले अमुल्य मत धनुष्यबाण या चिन्हावर देऊन बीडचे नाव राज्यात पोहोचवा, असे आवाहन त्यांनी केले.जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आदि गावातील बहूसंख्य नागरिक, युवक, महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.गल्ली ते दिल्ली सरकार असेल तर जनतेला फायदायावेळी जयदत्त क्षीरसागर म्हणाले, धर्मवीर असे ज्यांना संबोधतात ते विलास महाराज आपल्यासोबत आहेत तसेच काकूंच्या काळापासून माझ्या पाठीशीही हा परिसर उभा राहिला आहे. हा योग जुळून आला आहे. दिल्ली ते गल्लीपर्यंत एकच सरकार असेल तर त्याचा फायदा होतो. नवा इतिहास घडविण्याची ही संधी आहे मी शेवटपर्यंत जनतेच्या प्रश्नासाठी काम करणार आहे. जनतेचे प्रेम हाच आपला श्वास आहे. त्यामुळे जनता एकमताने धनुष्यबाण पाहून मतदान करेल असा विश्वास वाटतो, असेही क्षीरसागर म्हणाले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019beed-acबीडJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरShiv Senaशिवसेना