शहरं
Join us  
Trending Stories
1
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
4
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
5
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
6
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
7
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
8
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
9
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
10
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
11
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
12
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
13
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
14
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
15
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
16
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
17
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
18
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
19
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

माहेरी वृक्षारोपण करून ती जाते सौभाग्यासोबत नांदायला....!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 00:51 IST

पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्षलागवड अनिवार्य असल्याचा सावधानतेचा इशारा व मंगलाची वृध्दी होण्यासाठी हळदीच्या अंगाने, मेंदीच्या हाताने, तसेच हातात हिरवा चुडा व मुंडावळीच्या साक्षीने आपल्या सौभाग्यासह माहेरी वृक्षरोपांची लागवडही आठवण ठेवून माहेरवाशीण नांदायला जाते. असा अनोखा पण अनुकरणीय उपक्रम खालापुरीमधे सुरू केलाय.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरूर कासार : पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्षलागवड अनिवार्य असल्याचा सावधानतेचा इशारा व मंगलाची वृध्दी होण्यासाठी हळदीच्या अंगाने, मेंदीच्या हाताने, तसेच हातात हिरवा चुडा व मुंडावळीच्या साक्षीने आपल्या सौभाग्यासह माहेरी वृक्षरोपांची लागवडही आठवण ठेवून माहेरवाशीण नांदायला जाते. असा अनोखा पण अनुकरणीय उपक्रम खालापुरीमधे सुरू केलाय. खालापुरी व्हॉटस् अ‍ॅप ग्रुप व शासकीय कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्तुत्य अशा उपक्रमात वनविभागाने आपलाही सहभाग नोंदवला आहे. ‘शुभ मंगल सावधान’ची सुरुवात भारतीय सैन्यात सेवेत असलेल्या जवानाच्या व त्याच्या सहचारिणी या नव दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आली.तालुक्यातील खालापुरी हे शिरूरच्या पूर्वेला, तर श्रीक्षेत्र नारायण गडाच्या पश्चिमेला पायथ्याशी वसलेले गाव आहे. येथे शासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने असून, नव्याचा शोध घेणारी तरूणाई आणि साथीला वयोवृद्ध मंडळींचा पाठिंबा. सतत वेगळा उपक्रम हाती घेऊन त्याची पूर्तता करणे ही त्यांची खासियत. प्रत्येक वर्षी वेगळा उपक्रम राबविण्यात येतो.या वर्षी मुलीला माहेरहून लग्न लावून सासरी पाठवताना तिची आठवण म्हणून लेक व जावई यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला व त्याचा प्रथम मानकरी म्हणून भारतीय जवान योगेश कुंडलिक रकटे व शीतल अशोक परजने यांच्या हस्ते या ‘शुभमंगल सावधान’ या उपक्रमास सुरुवात झाली. दुसरा विवाह वर्षा कल्याण परजने व आनंद म्हसूनाथ खोड या नवदाम्पत्याच्या हस्ते वृक्षारोपण झाले. यानंतर लेकीची आठवण म्हणून त्या रोपाचे संगोपन करण्यासाठी लेकीच्या माहेरच्यावर पालकत्वाच्या नात्याने सोपवली जाते. लेक जावयाने लावलेले झाड आता लेकीप्रमाणेच लाडाने वाढवण्याची नैतिक जबाबदारी माहेरच्या लोकामार्फत स्वीकारली जाते. या उपक्रमामुळे पर्यावरण व मंगलवृध्दी असा दुहेरी हेतू साध्य होणार असल्याने प्रत्येकाला हा उपक्रम आपला कौंटुबिक असल्याची जाणीव होत आहे .खालापुरी ग्रुप व शासकीय कर्मचारी यांचा संयुक्त उपक्रम असला तरी खालापुरीच्या घराघरातील प्रत्येकाचा त्यात सहभाग सामावला जातो. वृक्ष लागवड हा उपक्रम वनविभागाशी निगडीत असल्याने याच गावचे रहिवासी असलेले बद्रिनाथ परजने व त्यांचा वनविभाग या कार्यासाठी हातभार म्हणून लागणारी रोपे उपलब्ध देण्याची जबाबदारी स्विकारत आहे.एवढ्यावरच न थांबता जो कोणी असा उपक्रम हाती घेईल त्याला देखील वृक्षारोपाच्या मर्यादेत सहकार्य केले जाईल, असे बद्रीनाथ परजने यांनी लोकमतजवळ सांगितले.लग्नप्रसंगी व तिथी तारीख सांगितल्यानंतर रोपे थेट मांडवाच्या दारात पोहोचती केली जातील, याची हमी देखील त्यांनी दिली आहे .पर्यावरणाचे संतुलन व वृक्ष लागवडीचे महत्त्व आता जवळपास सर्वांनाच उमगले आहे. त्याला प्रेरणा देण्यासाठी आणि झालेल्या बेसुमार वृक्षतोड सावधानतेचा इशारा वृक्षसंवर्धनाचा हेतू साध्य करण्यासाठी खालापुरीकरांनी सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद तर आहेच शिवाय तो अनुकरणीय देखील आहे.प्रत्येकाने या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन ग्रुपच्या सर्व सदस्यांकडून व शासकीय कर्मचारी खालापुरी यांनी केले आहे. आपल्या या कामाची दखल घेत खालापुरी ग्रामस्थांशिवाय बाहेरचे हात देखील या उपक्रमासाठी लागलेले असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :environmentपर्यावरणmarriageलग्नSocialसामाजिकNatureनिसर्ग