शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; माजी आमदार संगीता ठोंबरे यांचा शिंदेसेनेत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 17:24 IST

संगीता ठोंबरे 2014 मध्ये भाजपकडून केज मतदारसंघातून आमदार राहिल्या आहेत.

मधुकर सिरसट/केज: बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी(शरद पवार)ला मोठा धक्का बसला आहे. शरद पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्ष आणि केज विधानसभेच्या माजी आमदार प्रा. संगीता ठोंबरे यांनी आपल्या समर्थकांसह आज(दि.18) शिवसेना पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत जाहीर प्रवेश केला.

या पक्षप्रवेशावेळी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हेदेखील उपस्थित होते. शिरसाटांनी ठोंबेर यांचे अभिनंदन केले व केज विधानसभेमध्ये शिवसेना पक्षाला बळकटी मिळेल, अशी आशा व्यक्त केली. यावेळी शिवसेना बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळुक, शिवसेना नेते अनिल जगताप, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना नेते अजित  पिंगळे  यांच्यासह शिवसेनेचे नेते व पदाधिकारी हजर होते. 

यांनीही केला शिवशेनेत प्रवेश..!

आमदार ठोंबरे यांच्यासोबत डॉ. विजयप्रकाश ठोंबरे, कुंभेफळचे माजी सरपंच किशोर थोरात, भगवान सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय  केंद्रे, अशोक सक्राते ,  अरविंद चाळक,  उमेश चाळक यांच्यासह केज मतदार संघातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

जि.प.च्या अध्यक्षपदावर डोळा...

2014 मध्ये भाजपा तर्फे केज विधान सभेच्या आमदार राहिलेल्या संगीता ठोंबरे यांना 2019 च्या निवडणुकीत भाजपाने उमेदवारी नाकारून नमिता मुंदडा यांना दिली. त्यानंतर आमदार होण्यासाठी त्यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये खासदार बजरंग सोनवणे यांच्या मध्यस्तीने राष्ट्रवादी(शरद पवार) पक्षात प्रवेश केला होता. मात्र, यावेळीही त्यांचा अपेक्षाभंग झाला. परंतु आता डोळा आगामी जि.प. निवडणुकीवर लागला आहे. यासाठीच त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याची चर्चा केज मतदारसंघात रंगली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sharad Pawar's NCP hit in Beed: Ex-MLA Thombare joins Shinde's Sena.

Web Summary : Ex-MLA Sangeeta Thombare, a Sharad Pawar NCP leader, joined Eknath Shinde's Shiv Sena with supporters. Political motives linked to upcoming elections are speculated.
टॅग्स :Sangeeta Thombareसंगीता ठोंबरेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे