शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

'तुतारी' हाती घेण्याच्या चर्चेतच उमेदवारी न मिळाल्याचा धक्का; आडसकर, मेटे, मस्केंची बंडखोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 19:34 IST

शरद पवारांनी ऐनवेळी भाकरी फिरवली; आता ते अर्ज ठेवतात की मागे घेतात, हे ४ नोव्हेंबरला समजणार आहे. परंतु सध्या तरी त्यांच्या प्रवेशाची आणि उमेदवारी नाकारल्याची चर्चा जोरात सुरू आहे.

बीड : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळेल, या अपेक्षेने भाजपचे रमेश आडसकर, राजेंद्र मस्के आणि ‘शिवसंग्राम’च्या डॉ. ज्योती मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. परंतु ऐनवेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाकरी फिरवत दुसऱ्यांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे या तिघांचीही निवडणूक मैदानात उतरण्याआधीच विकेट गेली. आता या तिघांनीही बंडखोरी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता ते अर्ज ठेवतात की मागे घेतात, हे ४ नोव्हेंबरला समजणार आहे. परंतु सध्या तरी त्यांच्या प्रवेशाची आणि उमेदवारी नाकारल्याची चर्चा जोरात सुरू आहे.

मागील काही महिन्यांत राज्यात राजकीय घडामोडी झाल्या. त्यामुळे जिल्ह्यातील समीकरणेही बदलली. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत विरोधात लढलेलेदेखील आता मांडीला मांडी लावून बसत होते. परंतु आता तेच नेते उमेदवारीसाठी पक्षाकडे हट्ट धरत होते. प्रत्येक मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडे इच्छुकांची संख्या मोठी होती. प्रत्येक जण सहा महिन्यांपासून तयारीला लागला होता. परंतु ऐनवेळी मात्र, उमेदवारी मिळत नसल्याचे पाहून काही नेत्यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला. यामध्ये ‘शिवसंग्राम’च्या डॉ. ज्याेती मेटे, माजलगावातून इच्छुक असलेले भाजपचे रमेश आडसकर आणि बीडमधून राजेंद्र मस्के यांचा समावेश होता. डॉ. मेटे यांचे नाव लोकसभेतही चर्चेत होते; परंतु ऐनवेळी बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली होती. परंतु आडसकर आणि मस्के मात्र, आपल्याला उमेदवारी मिळेल, या आशेने शरद पवार गटात गेले होते. परंतु त्यांना पक्षाने नाकारत दुसऱ्यालाच उमेदवारी दिली. त्यामुळे आता या तिघांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

राजेंद्र मस्केंचे नाव आघाडीवरबीड मतदारसंघातून जरांगे फॅक्टर चालेल, या आशेने मराठा चेहरा म्हणून राजेंद्र मस्के यांनाच उमेदवारी मिळेल, असे संकेत होते. यासंदर्भात विचारणाही झाली होती; परंतु शेवटी संदीप क्षीरसागर यांचेच नाव जाहीर केले. त्यामुळे मस्के नाराज झाले. आता त्यांनी बीड मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्यावतीने हा अर्ज असल्याचे सांगण्यात आले. परंतु जरी अर्ज मागे घेतला तरी मस्के हे संदीप क्षीरसागर यांचे काम करणार का? हा प्रश्न आहे. कारण, काही दिवसांपूर्वी याच मस्केंनी क्षीरसागर मुक्त बीड करण्याचे आवाहन केले होते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकbeed-acबीडmajalgaon-acमाजलगांवSharad Pawarशरद पवार