शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
7
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
8
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
9
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
12
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
13
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
14
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
15
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
16
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
17
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
18
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
19
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
20
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...

तिघांच्या त्रासाला कंटाळून जाळून घेतलेल्या शाम काळेचा अखेर मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 19:26 IST

कर्जाच्या रक्कमेतून तिघांनी त्रास दिल्याने घेतले होते पेटवून

केज (बीड) : केज येथे दि. 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान  स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतलेल्या शाम काळेची मृत्यूशी झुंज थांबली. सोमवारी रात्री 11वाजता स्वाराती रुग्णालय अंबाजोगाई येथे त्यांचा मृत्यू झाला आहे .

परभणी जिल्ह्यातील मूळचे रहिवाशी असलेले शाम काळे हे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात 20 वर्षांपासून प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून कार्यरत होते. 24 जानेवारी रोजी दादा मुंडे आणि सचिन सलगर व विजय जावळे यांच्याकडून त्याने 10 टक्के व्याजाने 3 लाख रुपये  घेतले होते. त्या पैशाच्या बदल्यात शाम काळे याला ते तिघेजण त्याचे राहते घर त्यांच्या नावावर लिहून दे. अशी मागणी करीत होते. यामुळे शाम याने दि. 18 फेब्रुवारी रोजी त्यांना स्टॅम्प पेपरद्वारे स्वतःचे राहते घर नोटरी करून लिहून दिले होते.

दरम्यान दि. 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजण्याच्या  दरम्यान दादा मुंडे, सचिन सलगर आणि विजय जावळे यांनी कॉलेजवर जाऊन शाम यास बळजबरीने चारचाकी वाहनात बसवून केज-बीड महामार्गांवरील शिक्षक कॉलनी भागात आणले. नोटरीवर भागत नाही तुझ्या घराची रजिस्ट्री आमच्या नावाने करून दे म्हणून धमकी दिली. या त्रासाला कंटाळून व वैफल्यग्रस्त शाम याने पेट्रोल अंगावर ओतून स्वतःला पेटवून घेतले. या बाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि पोलीस नाईक त्रिंबक सोपणे यांनी जखमी शाम काळे याचा उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्या समक्ष स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील जळीत वार्डात मृत्यूपूर्व जबाब नोंदवून घेतला होता. 

या जवाबा वरून केज पोलीस ठाण्यात दादा मुंडे, सचिन सलगर आणि विजय जावळे ( तिघे रा. कळंब ) यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात भा दं वि 365, 504, 506,व 34 आणि महाराष्ट्र सावकारकी अधिनियम 2014 चे कलम 39 व 45  नुसार केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून पुढील तपासासाठी कळंब जि उस्मानाबाद पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. शाम काळे यांच्या मृत्यूची माहिती मिळताच पंचनामा करून उत्तरीय तपासणी करून पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याची माहिती कळंब पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड