शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

संपूर्ण बीड जिल्ह्यात भयंकर दुष्काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 00:45 IST

गुरुवारी येणारे केंद्राचे पथक दुष्काळी पाहणी करणार आहे. परंतू पथकाने पाहिलेली परिस्थिती आणि महिना- दीड महिन्यानंतर उद्भवणारी परिस्थिती यात मोठी तफावत राहणार आहे,

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गुरुवारी येणारे केंद्राचे पथक दुष्काळी पाहणी करणार आहे. परंतू पथकाने पाहिलेली परिस्थिती आणि महिना- दीड महिन्यानंतर उद्भवणारी परिस्थिती यात मोठी तफावत राहणार आहे, ही बाब जिल्हा प्रशासनाने पथकाला पटवून देण्याची गरज आहे. मागील पाच वर्षात बीड जिल्ह्यात पाऊस प्रमाण कमी अधिक राहिलेतरी खरीप व रबी दोन्ही हंगाम वाया गेले नव्हते. पिण्याच्या पाण्याचे हाल झाले नव्हते. मागील पाच वर्षांचा तुलनात्मक अभ्यास केलातर मांडलेला तर्क वेगळा निघू शकतो. त्यामुळे यंदाच्या संभाव्य भीषण दुष्काळाची दाहकता पथकापुढे प्रभावीपणे मांडावी लागणार आहे.जिल्ह्यात यावर्षी अत्यंत कमी पावसामुळे खरीप आणि रबी दोन्ही हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पाणी पातळी खोलवर चालली आहे. थोडेफार उपलब्ध असलेल्या पाण्यावर सध्या ग्रामीण जनता दिवस काढत आहे. पण खरा दुष्काळ जानेवारीनंतर जाणवणार आहे. पिण्याचे पाणी, पशुधनासाठी चारा आणि वितरण व्यवस्था पुरेसे अन्नधान्य उपलब्ध करुन द्यावे लागणार आहे.बीड जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान ६६६. ३६ आहे. यंदा ३३४. ७० मिमी पाऊस झाला आहे. मागील वर्षीची तुलना केली तर ५० टक्के पाऊस कमी झाला आहे. पण हा पाऊस काही महिने धीर देण्यापुरताच बरसलेला आहे. सध्या पाणी असलेतरी जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये पाण्यासाठी जनतेची कसरत सुरु झाली आहे. गाव परिसरातील जलस्त्रोत आटल्याने दूर अंतरावरुन पाणी आणावे लागणार आहे. त्यामुळे कराव्या लागणाऱ्या उपाययोजनेसाठी निधीची उपलब्धता वेळेवर होणे गरजेचे आहे.दुष्काळ पाहणीसाठी आज केंद्राचे पथक जिल्हा दौºयावरलोकमत न्यूज नेटवर्कबीड : राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे पथक आज जिल्हा दौ-यावर येणार आहे. यामध्ये विविध विभागाचे मुख्य अधिकाºयांचा समावेश असणार आहे. गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास परळी तालुक्यातीतून दुष्काळी पाहणी दौरा सुरु होणार आहे. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन पथक केंद्र शासनाकडे अहवाल सादर करणार आहे.दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र कृषी विभागाच्या योजना आयोगाचे सह सल्लागार मनीष चौधरी, पेयजल व स्वच्छता विभागाचे एस.सी.शर्मा, ग्रामविकास खात्याचे एस.एन. मिश्रा यांचा सहभाग असणार आहे. तसेच राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले, आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, पुनर्वसन विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर, महाराष्ट्र रिमोट सेन्स्ािंग अ‍ॅप्लीकेशन सेंटरचे रांजणकर, जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, कृषी अधीक्षक एम.एल.चपळेसह महसूल, कृषी व इतर विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग असणार आहे.परभणी जिल्ह्यातील पाहणी दौरा झाल्यानंतर पथक परळी तालुक्यातील रेवली येथे दुपारी २ च्या सुमारास दुष्काळी पाहणीस सुरुवात करणार आहेत. त्यानंतर माजलगाव मार्गे वडवणी तालुक्यातील खडकी, बीड तालुक्यातील जरुड, कांबी या गावांची पाहणी केली जाणार आहे. यावेळी पथकातील प्रत्येक अधिका-यांसोबत जिल्ह्यातील अधिकारी असणार आहेत. पथक येणार असल्याने बुधवारी दिवसभर प्रशासन अहवाल तयार करण्यात व्यस्त होते.दुष्काळी पाहणी दौरा करण्यासाठी आलेले केंद्राचे पथक मागील ५ वर्षातील पर्जन्यमान, पीकपरिस्थिती, पाणी पातळी तसेच शासनाच्या वतीने मंजूर केलेल्या विविध योजना व प्रशासनाने केलेली अंमलबजावणी याचा आढावा घेणार आहे. यामध्ये कृषी विभागाच्या मार्फत शेतक-यांसाठी राबवलेल्या विविध योजना त्यामध्ये कांदाचाळ, ठिबक, मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार यासह चारा टंचाईची पाहणी केली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मागील पाच वर्षाची माहिती संकलित केली असून ती केंद्र पथकाला दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

टॅग्स :droughtदुष्काळCentral Institute Of cotton researchकेंद्रीय कापूस संशोधन संस्था