शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

बीड जि.प.मध्ये आत्मदहनाच्या प्रयत्नातील सात जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 00:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : तालुक्यातील नेकनूर येथील एका खासगी संस्थेतील चार शिक्षक व तीन शिक्षकांचे पती असे सात ...

ठळक मुद्देअनुदानाची मागणी : चार शिक्षकांसह तीन शिक्षिका पतींचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : तालुक्यातील नेकनूर येथील एका खासगी संस्थेतील चार शिक्षक व तीन शिक्षकांचे पती असे सात जण जिल्हा परिषदेत आत्मदहन करण्याच्या उद्देशाने जिल्हा परीषदेत पोहचले. मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेत या सर्वांना ताब्यात घेतले. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता हा प्रकार घडला. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली आहे. त्रुटींची पूर्तता करुन अनुदान द्यावे या मागणीसाठी त्यांनी हा पवित्रा घेतल्याचे सांगण्यात येते.मुख्याध्यापक पठाण रिजवान खान (रा. बलभीम चौक, बीड), शिक्षक मनियार इस्माईल मुसा, सय्यद अब्दूल बारी (दोघे रा. नेकनूर), बन्सी पर्बत हांगे (रा. नांदूरघाट ता. केज) व शिक्षिका पती शेख मुजमील शेख खलील, सय्यद मोहसीन सय्यद सलीम (दोघे रा. नेकनूर), शेख मुसा शेख रफीक (रा. शहेंशाहनगर) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. हे सर्व बीड तालुक्यातील नेकनूर येथील बहादूरशहा जफर उर्दू हायस्कूलचे असल्याचे सांगण्यात येते.२०१३-१४ मध्ये झालेल्या मूल्यांकनानुसार पाचवी ते सातवीपर्यंतच्या वर्गांना अनुदान मंजूर झाले होते. मात्र, इयत्ता आठवी ते दहावीच्या वर्गात पटसंख्या कमी होती. प्रत्येक वर्गात ३० पेक्षा कमी विद्यार्थी आढळल्याने या तीन वर्गांना अनुदान नाकारले होते. दरम्यान, आता तिनही वगार्तील पटसंख्या वाढली असून त्या आधारे अनुदान मंजुरीसाठी प्रस्ताव शासनास पाठविण्याची मागणी संस्थेतील सात शिक्षकांनी केली होती.मात्र, शासन निर्णयानुसार २०१३- १४ नंतर मूल्यांकन न झाल्याने असा प्रस्ताव पाठविता येत नाही. त्यामुळे सनदशीर मार्गाचा अवलंब करण्याऐवजी मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान मुख्याध्यापकासह सात जण हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन जि. प. मध्ये पोहोचले. शिक्षणाधिकारी (मा.) भगवान सोनवणे यांच्या दालनात त्यांनी ठिय्या दिला. त्यानंतर शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक बिपीन शेवाळे यांनी कर्मचाºयांसह धाव घेत या सातही जणांना ताब्यात घेतले. या सर्वांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे यांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत शिक्षणाधिकारी (मा.) भगवान सोनवणे हे शिवाजीनगर ठाण्यात तळ ठोकून होते. सोबत उपशिक्षणाधिकारी मोहन काकडे हेही होते.खळबळ : प्रतिबंधात्मक कारवाईशिक्षण विभागात जि.प.सह खाजगी शाळांची प्रकरणे असतात. यंत्रणा शासन निर्णयानुसार काम करते. आक्रमकपणे वर्तन करुन यंत्रणेवर दबाव आणण्याचे प्रकार यापुर्वीही घडले आहेत. सनदशीर मार्गाने प्रश्न सोडविण्याची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

टॅग्स :Beedबीडzpजिल्हा परिषदagitationआंदोलन