शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

७ व्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दगडू लोमटे यांची निवड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 14:25 IST

अमरावती येथील शब्द परिवार आयोजित हे संमेलन नेपाळमध्ये जानेवारीत होणार आहे 

अंबाजोगाई (बीड) : येथील यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचे सचिव, मसाप अंबाजोगाई शाखेचे अध्यक्ष साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते दगडू लोमटे यांची अमरावती येथील शब्द परिवार या संस्थेच्या वतीने नेपाळ येथे आयोजित केलेल्या ७ व्या विश्व मराठीसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड जाहीर केली आहे. अशी घोषणा शब्द परिवाराचे प्रमुख संजय सिंगलावर यांनी केली आहे.

शब्द परिवार अमरावती यांच्या वतीने २०१४ पासून हे विश्व मराठी साहित्य संमेलन सुरू केले आहे. साहित्यातील कथा, कादंबरी, कविता, गझल, ललित, आत्मकथन लेखन करणाऱ्या साहित्यिक यांच्या बरोबरच साहित्यिक व सांस्कृतिक कार्यकर्ता यांना संमेलनाचे अध्यक्ष केले जाते. यापूर्वी बँकॉक, दुबई, इंडोनेशिया,मले, श्रीलंका, मालदीव येथे हे संमेलने झाली यावेळी ते नेपाळ येथे संपन्न होणार आहे. किशोर कदम (सौमित्र), ज्ञानेश वाकुडकर, संजय आवटे, सिद्धार्थ भगत व प्राचार्य नागनाथ पाटील यांनी या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. या वर्षी नेपाळ येथे होणाऱ्या ७ व्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी, साहित्यिक व साहित्य, संगीत, सामाजिक, पर्यावरण, कला क्षेत्रातील महत्वाचे कार्यकर्ता म्हणून कार्य केलेल्या दगडू लोमटे यांची निवड केलेली आहे.

त्यांच्या अनेक कविता, लेख प्रसिद्ध आहेत. राहून गेलेली पत्रे हे ललित बंध व पांगलेल्या प्रार्थना हा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. त्यांना यापूर्वी  शब्द सह्याद्री प्रतिष्ठानचा पुरस्कार परभणी, बाबा आमटे सामाजिक कार्य विशेष पुरस्कार शांतीवन बीड, स्नेहालय नगरचा डॉ. सुब्बाराव पुरस्कार, साहित्य व कला प्रसरिणी मंडळ पुणे विशेष कार्य पुरस्कार, मारवा फाऊंडेशन पुणे यांचा संगीत कार्य व प्रसारासाठी डॉ. अण्णासाहेब गुंजकर पुरस्कार, सामाजिक एकोपा व शांती यासाठी जमाते इस्लामी हिंद अंबाजोगाईचा सामाजिक सौहार्द पुरस्कार, आद्यकवी मुकुंदराज काव्य रत्न पुरस्कार, भारत जोडो अकादमी किनवट,  कार्यकारिणी सदस्य व सांस्कृतिक प्रमुख मराठवाडा साहित्य परिषद -  औरंगाबाद, ललित कला अकादमी, आनंदवन मित्र मंडळ अशा अनेक संस्थांचे  ते पदाधिकारी राहिले आहेत. 

१९८५ सालच्या बाबा आमटे यांच्या भारत जोडो अभियान सायकल यात्रेत  कन्याकुमारी ते कश्मीर त्यांचा सहभाग होता. या निवडीमुळे सर्वच स्तरातून दगडू लोमटे यांचे अभिनंदन होत आहे. मराठवाड्याला विश्व साहित्य साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा पहिल्यांदाच बहुमान मिळाला आहे.

टॅग्स :marathiमराठीliteratureसाहित्यBeedबीड