शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

पाहणी दौऱ्याकडे विधिमंडळ समिती सदस्यांसह सचिवांनी फिरवली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 00:55 IST

विधिमंडळ अंदाज समिती प्रशासकीय कामांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी जिल्हा दौºयावर आली होती. मात्र, या पाहणी दौºयाकडे विधिमंडळ सदस्यांसह सचिवांनी देखील पाठ फिरवली. या समितीमध्ये २७ आमदारांचा चमू व १० विविध विभागाचे सचिव येणार होते. परंतु प्रत्यक्षात पाहणी करण्यासाठी फक्त ९ आमदार व २ सहसचिवांनी हजेरी लावली.

ठळक मुद्दे२७ पैकी ९ आमदार व दोन सह सचिव हजर; विविध विभागांची केली पाहणी

बीड : विधिमंडळ अंदाज समिती प्रशासकीय कामांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी जिल्हा दौऱ्यावर आली होती. मात्र, या पाहणी दौ-याकडे विधिमंडळ सदस्यांसह सचिवांनी देखील पाठ फिरवली. या समितीमध्ये २७ आमदारांचा चमू व १० विविध विभागाचे सचिव येणार होते. परंतु प्रत्यक्षात पाहणी करण्यासाठी फक्त ९ आमदार व २ सहसचिवांनी हजेरी लावली.

जिल्ह्यात करण्यात आलेल्या विकास कामांचा आढावा व विविध विभागातील कामांना भेटी देण्यासाठी विधिमंडळ सदस्य समिती जिल्हा दौ-यावर आहे. समितीच्या नियोजित शासकीय कार्यक्रमाची रुपरेषा प्रशासनाने ठरवली होती. सकाळी ९ वाजेपासून कार्यक्रमास सुरुवात होणार होती. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी देखील केली होती. सकाळी ११ वाजता विधिमंडळ सदस्य जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी एम.डी. सिंह व इतर प्रमुख अधिकाºयांनी सदस्यांचे स्वागत केले.

सर्व विभागातील प्रमुख अधिकाºयांनी राबवलेल्या योजनांबद्दल उपस्थित सदस्यांना माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय अधिकाºयांची संख्या कमी असूनही जिल्ह्यात विविध योजना योग्य पद्धतीने राबवल्याचे सांगितले. त्यानंतर सदस्यांची दोन पथके जिल्हा दौºयावर रवाना झाली.आष्टी तालुक्यातील कामांची पाहणी करण्यासाठी आ. विजय वडेट्टिवार, राजेश काशीवार, कृष्णा गजबे, कृष्णा खोपडे, विजय रागडहाले या सदस्यांचे पथक रवाना झाले. दुसरीकडे परळी कामांच्या पाहणीसाठी आ. अनिल कदम, रमेश बुंदेले डॉ.संजय रायमुलकर, वसंतराव चव्हाण यांचे पथक गेले होते. पाहणीनंतर कामांसंदर्भात पथकातील सदस्यांनी अधिका-यांसमवेत चर्चा केली.

पथकाला आघाडीचे निवेदनबीड नगर पालिकेच्या कामासंदर्भात काकू-नाना आघाडीच्या नगरसेवकांनी विधिमंडळ अंदाज समितीला निवेदन दिले. निवेदन पाहून समिती सदस्यांनी चर्चा केली.

आष्टीत अधिका-यांना धरले धारेवरआष्टी येथे चार सदस्यांनी नगरपंचायतमध्ये अधिकाºयांची चौकशी केली. खडकत येथील सिमेंट रस्ता, जामगाव येथील दलित वस्ती स्मशानभूमी तसेच नगरपंचायतच्या विविध कामांचा आढावा घेत अधिका-यांना धारेवर धरले.समितीने न.पं.च्या तत्कालीन व विद्यमान मुख्याधिकाºयांच्या कामांची चौकशी केली. विचारलेल्या प्रश्नांदरम्यान उत्तरे देताना मुख्याधिकारी गोंधळलेल्या दिसून आल्या. आंधळेवाडी, पोखरी येथील रस्ता पाहणी केली.उप विभागीय अधिकारी गणेश नि-हाळी, तहसीलदार रामेश्वर गोरे, ना. त. सुभाष कट्टे, कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांच्यासह स्थानिक प्रतिनिधी होते.

या सदस्यांनी मारली दांडीधनंजय गाळगीळ, उन्मेष पाटील, देवयानी फरांदे, प्रकाश आबीटकर, प्रताप पाटील-चिखलीकर, कुणाल पाटील, दादासाहेब मुरकुटे, आकाश फुंडकर, सुनिल प्रभू, शामराव उर्फ बाळासाहेब पाटील, दत्तात्रय भरणे, प्रदीप जाधव, धैर्यशील पाटील, अबू आझमी, डॉ. नीलम गोºहे, राहुल नार्वेकर, सुजितसिंह ठाकूर, अनिल गाडगीळ हे विधिमंडळ समिती सदस्यांसह सचिव गैरहजर होते.

टॅग्स :BeedबीडMLAआमदारMarathwadaमराठवाडा