शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शाळा बंद, कार्यालयांचे काम ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 23:52 IST

बीड : जुनी पेन्शन योजना लागू करावी, कंत्राटी धोरण बंद करावे, प्रसुती रजा वाढवाव्या, शिक्षकांना अवांतर कामे देऊ नयेत,वेतन ...

ठळक मुद्दे३८ संघटनांचा संप : बीड जिल्ह्यात २० हजारावर शिक्षक, कर्मचारी सहभागी; तालुका, जिल्हा प्रशासनाला निवेदन

बीड : जुनी पेन्शन योजना लागू करावी, कंत्राटी धोरण बंद करावे, प्रसुती रजा वाढवाव्या, शिक्षकांना अवांतर कामे देऊ नयेत,वेतन आयोगातील त्रुटी दूर कराव्यात यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीने पुकारलेल्या आंदोलनामुळे सोमवारी जिल्ह्यातील शाळांना अघोषित सुटी राहिली. तर सरकारी व निमसरकारी कार्यालयांमध्ये सर्वसामान्यांची कामे खोळंबली. जिल्ह्यात २० हजारपेक्षा जास्त शिक्षक, कर्मचारी या संपात सहभागी झाले होते. मागण्या मान्य न झाल्यास ११ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला.माजलगावात आंदोलनशिक्षकांच्या संपामुळे माजलगाव तालुक्यातील शाळा बंद होत्या. तहसीलदार डॉ.प्रतिभा गोरे व गटशिक्षणाधिकारी रवींद्र महामुनी यांना निवेदन दिले. यावेळी पुरु ष शिक्षकांबरोबरच महिला शिक्षिका व इतर विविध विभाागत काम करणाऱ्या महिला तसेच तालुक्यातील शिक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विविध संघटनांच्या तालुका पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.धारुर तालुक्यात कडकडीत बंदधारुर तालुक्यातशिक्षकांच्या संपामुळे शाळा बंद होत्या तर कर्मचाºयांच्या संपामुळे कार्यालयात शुकशुकाट होता. येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत एकत्र आलेल्या शिक्षक, कर्मचाºयांनी गटशिक्षणाधिकाºयांना निवेदन दिले. त्यानंतर पंचायत समितीसह तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढून घोषणा देत सरकारी धोरणांचा विरोध केला. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.वडवणीत प्रशासनाला निवेदनवडवणी तालुक्यात झालेल्या आंदोलनात सोमवारी संपकरी शिक्षक व कर्मचाºयांनी तहसील व पंचायत समिती प्रशासनाला लेखी निवेदन दिले. या संपामध्ये नीलेश चव्हाण, बाप्पू धन्वे, अंगद मुंडे, सुंदर डोंगरे, संतोष घोडेराव, झुंबर गव्हाणे, पंजाबराव देशमुख, शेख जलील, रोहिदास चव्हाण, श्रीकृष्ण उंडाळे, कमलाकर खंदारे, तुकाराम राठोड, परमेश्वर बिडवे, संतोष सावंतसह शिक्षक व कर्मचारी सहभागी झाले.....तर ११ सप्टेंबरपासून बेमुदत आंदोलनसंपात जिल्ह्यातील शिक्षक तसेच महसूल, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, कृषी, पशूसंवर्धन, आरोग्य व इतर सरकारी, निमसरकारी कर्मचाºयांच्या ३८ संघटनांनी सहभाग घेतला.९० टक्के शाळा बंद होत्या. काही शाळांमध्ये शिक्षक आले परंतु विद्यार्थ्यांची उपस्थिती अत्यंत कमी होती. तसेच कार्यालयांमध्ये कामकाज झाले नाही.भगवान पवार, राजेंद्र खेडकर, सुनील कुर्लेकर, विजयकुमार समुद्रे, विष्णू आडे आदींसह समन्वय समितीचे पदाधिकाºयांनी तहसीलदार व जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. मागण्या मान्य न झाल्यास ११ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.निवेदन देणारे, घेणारे संपावरशिरूर तालुक्यातील शिक्षकांनी शाळा बंद ठेवून आंदोलन करण्यात आले. निवेदन घेणारे तहसीलचे कर्मचारी संपावर असल्याचा अनुभव यावेळी आला.यावेळी दिलीप जायभाये, विठ्ठल जाधव, अविनाश गाडेकर, अप्पासाहेब शिंदे, विकास खेडकर, कैलास तुपे , सुनिल खेडकर, संतोष रंध्वे, बाळासाहेब सिरसाट, भागवत सिरसाट, बाला कुरूडे, नितीन कैतके, बप्पा मोरे, रमेश सिरसाट,शिवलिंग परळकर, गोरख मिसाळ,कन्नालाल खामकर, सुभाष सानप,अप्पा तांबे, शहादेव मुळे,श्रीकांत देवढे, राजेंद्र जाधवसह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी होते.

टॅग्स :BeedबीडTeacherशिक्षकEmployeeकर्मचारीagitationआंदोलन