शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी डॉक्टरांच्या बदल्यांत घोळ; खोटी माहिती भरूनही उपसंचालकांकडून ग्रीन सिग्नल?

By सोमनाथ खताळ | Updated: May 26, 2023 15:53 IST

जर याची वेळीच दखल घेऊन दुरूस्ती झाली नाही तर न्यायालयात धाव घेण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

बीड : राज्यातील सरकारी डॉक्टरांच्या बदल्या पहिल्यांदाच ऑनलाईन होत आहेत. परंतू यात अनेक डॉक्टरांनी खोटी माहिती भरल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे असे असतानाही कसलीही खात्री न करता उपसंचालकांकडूनही त्याला ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. यामुळे या बदल्यांमध्ये ऑनलाईन घोळ झाल्याचे दिसून येत आहे. यासाठी उपसंचालक व संचालक कार्यालयातून आर्थिक उलाढाल झाल्याचीही माहिती आहे.

राज्यातील वैद्यकीय अधिकारी (गट अ वर्ग २) या पदाच्या डॉक्टरांच्या ऑनलाईन बदल्या पहिल्यांदाच होत आहेत. यासाठी खासगीतून होणारा खर्च टळल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले होते. परंतू आरोग्य विभागाने आक्षेप नोंदविल्यानंतर २६ मे रोजी अंतीम यादी प्रकाशित करण्यात आली. परंतू यात अनेकांनी खोटी माहिती भरून प्रशासनाची दिशाभूल केल्याचे समोर आले आहे. शिरूर तालुक्यातील खालापुरी आरोग्य केंद्रात सध्या एकमेव डॉ. संजीवणी गव्हाणे या नियमित वैद्यकीय अधिकारी आहेत. परंतू याच संस्थेत मागील ११ वर्षांपासून कार्यरत असल्याची माहिती एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ऑनलाईन अर्जात टाकली आहे. विशेष म्हणजे, यावर कसलाही आक्षेप न नोंदविता लातूर उपसंचालक कार्यालयातून ती पुढे पाठविण्यात आली आहे. त्यामुळे उपसंचालक कार्यालयातील कारभारावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. असेच प्रकार इतरांनीही केल्याचा आरोप होत असून याची खात्री करावी, अशी मागणी होत आहे.

बीडमधील डॉक्टर आक्रमकज्यांना हा प्रकार समजला त्यांनी याबाबत राज्याच्या आरोग्य विभागाला धारेवर धरले. तसेच ऑनलाईन व ऑफलाईन तक्रारी करण्याचाही निर्णय घेतला आहे. जर याची वेळीच दखल घेऊन दुरूस्ती झाली नाही तर न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही बीडच्या डॉक्टरांनी दिला आहे. जर असे झाले तर या बदल्यांना पुन्हा स्थगिती येऊ शकते, असे तज्ज्ञ सांगतात.

कोण काय म्हणतंय...खालापुरी आरोग्य केंद्रात डॉ.संजिवणी गव्हाणे यांच्याशिवाय एकही महिला अधिकारी कार्यरत नाहीत, असे शिरूरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक गवळी यांनी सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गिते म्हणाले, संबंधित महिला डॉक्टर बीडच्या अस्थापनेवर नाहीत. तर लातूरचे उपसंचाक डॉ.प्रदीप ढेले म्हणाले, आणखी प्रक्रिया सुरूच आहे. जिल्हास्तरावील अस्थापनेला बोलावून त्या अंतीम केल्या जातील. जर असे कोणी खोटी माहिती भरून दिशाभूल केली असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला जाईल, असे सांगितले.

चुकीचे समर्थन नाही खोटी माहिती भरून प्रशासनाची दिशाभूल करणे चुक आहे. चुकीचे समर्थन आम्ही करणार नाहीत, परंतू असेच प्रकार जिल्ह्यात अथवा राज्यात इतर ठिकाणी झाले आहेत का? याचीही प्रशासनाने तपासणी करावी. कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी, एवढीच मागणी आहे.- डॉ.नितीन मोरे, कार्याध्यक्ष, मॅग्मो बीड

टॅग्स :Beedबीडdoctorडॉक्टर