शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आणखी एका पतसंस्थेत घोटाळा; माजलगावच्या 'हिंदवी स्वराज्य'च्या अध्यक्षासह २० जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 17:24 IST

ठेवींचा गैरवापर करून तब्बल १ कोटी ८ लाख ३६ हजार ८१० रुपयांचा अपहार लेखापरीक्षणात उघड

माजलगाव ( बीड) : ठेवीदारांनी विश्वासाने ठेवलेल्या ठेवींच्या गैरवापर करून बनावट फाईल तयार करून बोगस कर्ज, बोगस सोनेतारण, बोगस नोंदी व हातावर रक्कम ठेवून १ कोटी ८ लाख ३६ हजार ८१० रुपयांच्या फसवणूक, अपहार केल्या प्रकरणी येथील हिंदवी स्वराज्य पतसंस्थेचा अध्यक्ष रमेश किसन वामन, सचिव महानंदा सखाराम मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश सखाराम मोरे यांच्यासह दहा संचालक, दहा कर्मचारी अशा २० जणांविरुद्ध माजलगाव शहर पोलीस ठाण्यात शासनाचे सहकारी लेखापरीक्षक यशवंत बन्सीधर शिंदे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

माजलगाव शहरातील धारुर रोडवरील एलआयसी ऑफिसच्यावर मागील अनेक वर्षापासून हिंदवी स्वराज्य पतसंस्था कार्यरत आहे. या ठिकाणी मागील एक वर्षभरात ठेवीदारांना आपल्या ठेवी परत न मिळाल्याने त्यांनी जिल्हा निबंधकांकडे या संस्थेविरुद्ध तक्रारी दाखल केल्या होत्या त्या अनुषंगाने शासनाचे लेखापरीक्षक यशवंत बन्सीधर शिंदे यांनी १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २४ या कालावधीत या संस्थेचे लेखापरीक्षण केले. या लेखापरीक्षणात संस्थेने कमाल रोख मर्यादेचे उल्लंघन केल्याचे आढळून आले तसेच हातावर रक्कम ठेवून अपहार केला तसेच बनावट कर्ज प्रकरण, सोने तारण कर्जवाटप करून ते तिजोरीत न ठेवता सदरील रकमेचा अपहार केल्याचे उघडकीस आले.

एकूण १ कोटी ८ लाखांचा अपहारया पद्धतीने रोख शिल्लक १५ लाख रुपये, बोगस नोंदी ५० लाख रुपये, बोगस कर्ज १२ लाख ४४ हजार रुपये असे मिळून एकूण एक कोटी आठ लाख ३६ हजार ८१० रुपयांचा अपहार झाल्याचे लेखपरीक्षणात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष रमेश वामन, सचिव महानंदा सखाराम मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश सखाराम मोरे यांच्यासह संस्थेतील कर्मचारी अजय नारायण नाईकनवरे, ताराचंद शाम बोले, भागवत अशोक गरड, गणेश माणिक वेळवे, अमर लहू देवकते, शुभम संजय गोपाळ, भागवत राजेभाऊ कुटे ,नरेंद्र राजेंद्र माधवे, भाग्यश्री रमेश वामन, वैष्णवी सुरेश मोरे, कमलाकर बाबासाहेब उंबरे, तेजस प्रकाश महाजन, सत्यभामा पांडुरंग पाष्टे, सुरेश चंद्र सुधाकर निळगे, मंगल श्याम बोले, अमोल लहू देवकते, आनंद निवृत्ती सरवदे, पवन मुरलीधर पदमगीरवार, प्रदीप मारुती गांजकर, प्रसाद प्रभाकर वंजारे या सर्वांनी मिळून संगनमताने संस्थेच्या रकमेच्या अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात लेखापरीक्षक शिंदे यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी रात्री गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

टॅग्स :BeedबीडfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी