शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

परळीचा सौरभ नावंदे दिल्लीत राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:36 IST

बीड : देशातील युवकांना विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्यासाठी केंद्रीय युवक व कल्याण व क्रीडामंत्री अनुराग ठाकूर ...

बीड : देशातील युवकांना विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्यासाठी केंद्रीय युवक व कल्याण व क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. १२) मूळचा परचुंडी (ता. परळी) येथील व सध्या पुण्यात स्थायिक झालेल्या सौरभ नावंदे याला २०१७-१८ च्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या औचित्याने केंद्रीय कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय युवक व कल्याण व क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते २०१७-१८ व २०१८-१९ च्या राष्ट्रीय युवा पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्रालय सचिव उषा शर्मा व संयुक्त राष्ट्रसंघाच्या भारतातील निवासी समन्वयक डियर्ड बायोडड उपस्थित होत्या.

या कार्यक्रमात सन २०१७-१८ साठी १४ व २०१८-१९ साठी ८ अशा २२ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यात सौरभला सन २०१७-१८ च्या राष्ट्रीय युवा पुरस्कार रु. एक लाख, पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सौरभ नावंदे याने २०१७ मध्ये क्वालालंपूर येथे आयोजित ''''राष्ट्र मंडल युवा शिखर संमेलना’त आणि २०१८ मध्ये न्यूयॉर्क येथे आयोजित संयुक्त राष्ट्रसभेत भारताचे प्रतिनिधित्व केले. त्याला महाराष्ट्र शासनानेही यापूर्वी यूथ आयकॉन पुरस्काराने सन्मानित केले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे सौरभने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी सौरभचे अभिनंदन केले. तसेच भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजा मुंडे, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह अनेकांनी सौरभचे अभिनंदन केले.

सौरभ हा सेवानिवृत्त क्रीडाधिकारी सुभाष नावंदे व औरंगाबाद जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे यांचा मुलगा असून, प्रेस फोटोग्राफर भीमाशंकर नावंदे व आदर्श शिक्षक अशोक नावंदे, सामाजिक कार्यकर्ते रामलिंगअप्पा नावंदे यांचा तो पुतण्या आहे.

170821\244517_2_bed_10_17082021_14.jpeg

परळीचा सौरभ नावंदे यास दिल्लीत राष्ट्रीय युवा पुरष्काराने सन्मानित करण्यात आले.