शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात सरपंचाच्या आईवर चोरट्यांचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 01:07 IST

धारुर तालुक्यातील कोळपिंप्री येथे रविवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सरपंच विजयकुमार खुळे यांच्या आई सुशीलाबाई खुळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करून चोरट्यांनी ऐवज लंपास केला. तसेच गावात अन्य एकाच्या घरी चोरी झाली. तर दुसऱ्या ठिकाणी चोरीचा प्रयत्न फसला. या चो-यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून ते दहशतीखाली आहेत. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिका-यांसह विशेष पथकांना पाचारण केले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कधारुर : तालुक्यातील कोळपिंप्री येथे रविवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सरपंच विजयकुमार खुळे यांच्या आई सुशीलाबाई खुळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करून चोरट्यांनी ऐवज लंपास केला. तसेच गावात अन्य एकाच्या घरी चोरी झाली. तर दुसऱ्या ठिकाणी चोरीचा प्रयत्न फसला. या चोºयांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून ते दहशतीखाली आहेत. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाºयांसह विशेष पथकांना पाचारण केले होते.

सरपंच विजयकुमार मुरलीधर खुळे यांच्या घरात शिरण्यापूर्वी त्यांनी इतर दरवाजांच्या बाहेरून कड्या लावल्या. चोरटे थेट सुशीलाबाई खुळे (वय ८०) यांच्या खोलीत शिरले. त्यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न करताच चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात कशाने तरी मारहाण केली. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. सकाळपर्यंत हे कोणाच्याही लक्षातही आले नाही. या खोलीतील एक पत्र्याची पेटी उचलून गावाच्या पश्चिमेस काही अंतरावर फेकून दिली. घरातील दीड ते दोन तोळे सोने लंपास केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर अनिल देशपांडे यांच्या घरात प्रवेश करताच ते जागे झाले. चोरट्यांनी दाबदडप करून घरातील साहित्य, कपडे चोरुन नेले. तसेच बाबूराव खुळे यांचे गेटचे कुलूप तोडले, परंतु चोरीचा प्रयत्न फसला.

दरम्यान, चोरट्यांनी केलेल्या मारहानीत सुशीलाबाई खुळे या गंभीर जखमी झाल्या असून, डोक्याला खोलवर जखम झाली आहे. रक्तस्त्रावही मोठ्या प्रमाणावर झाल्याने अंबाजोगाई येथील स्वा. रा. ती. ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे, पोलीस उपअधीक्षक मंदार नाईक, पोलीस निरीक्षक ए. एल. तेली यांनी भेटी दिल्या. स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथक, श्वान पथकानेही घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी धारुर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.३० वर्षानंतर गावात चोरीकोळपिंपरीत मागील ३० वर्षांपासून चोरी झाली नव्हती. परंतु सोमवारी एकाच रात्री चोरट्यांनी गावात धुमाकूळ घालत दोन ठिकाणी चोºया केल्या तर एका ठिकाणी त्यांचा प्रयत्न फसला. तसेच चोरट्यांनी मारहाणही केल्यामुळे ग्रामस्थ दहशतीखाली आहेत.

टॅग्स :BeedबीडCrimeगुन्हाMarathwadaमराठवाडाtheftचोरी