शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

संतोष देशमुख हत्या प्रकरण: वाल्मीक कराडसोबत त्याचे साथीदारही म्हणाले, मालमत्ता जप्ती नको

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 12:10 IST

संतोष देशमुख हत्या प्रकरण : दोषमुक्ती अर्जावर २२ जुलैला निकाल, कराडला नाशिक जेलमध्ये हलविणार का?

बीड : केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराड याच्या दोषमुक्ती व मालमत्ता जप्ती अर्जासंबंधी २२ जुलै रोजी न्यायालय आपला निकाल देणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सोमवारी दिली. कराड याचा दोषमुक्ती, प्रॉपर्टी अटॅचच्या अर्जासह इतर आरोपींनीसुद्धा त्यांची प्रॉपर्टी जप्त करू नये, असे विनंती अर्ज न्यायालयास सादर केल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा न्यायालयात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर सोमवारी दोन्ही पक्षांच्या वतीने युक्तिवाद झाला. सरकारी पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी कराड याची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद मकोका कायद्यात असल्याचे सांगितले. यावर कराड याचे वकील विकास खाडे म्हणाले की, प्रॉपर्टी आणि गुन्ह्याचा कुठलाही संबंध नाही. या प्रॉपर्टी कंपनी व इतर लोकांच्या जॉइंट प्रॉपर्टीज आहेत. या प्रॉपर्टीज गुन्ह्यामधून मिळविलेल्या नाहीत, त्यामुळे त्याचा व गुन्ह्याचा कुठलाही संबंध नाही. त्यामुळे त्या प्रॉपर्टी अटॅच करता येणार नाहीत. काही खाते व स्थावर मालमत्ता आहेत, त्याचाही या गुन्ह्याशी संबंध नसल्याची भूमिका ॲड. खाडे यांनी न्यायालयासमोर मांडली.

कराडला नाशिक जेलमध्ये हलविणार का?वाल्मीक कराड यास नाशिक कारागृहात हलविले जात असल्याबाबत विचारणा केल्यावर ॲड. खाडे म्हणाले, ही बाब प्रशासनाच्या अखत्यारित असून, त्यावर भाष्य करता येणार नाही. तसेच इतर कारागृहात स्थलांतर करण्यासंदर्भात आम्ही अर्ज केला नाही व आमच्या अधिकार क्षेत्रात ही बाब येत नसल्याचे ते म्हणाले. तर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले, कराड यास कोणत्या तुरुंगात ठेवणे अधिक सुरक्षित राहील याबाबत तुरुंग प्रशासन निर्णय घेईल. अशा प्रकारचा कुठलाही अर्ज आलेला नाही आणि त्याबद्दल न्यायालयाने आमच्याकडे विचारणा केली नाही.

टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याBeedबीडSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरण