शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

संतोष देशमुख हत्या प्रकरण; फरार आरोपींचे मृतदेह सापडल्याचा मेसेज खोटा

By सोमनाथ खताळ | Updated: December 29, 2024 17:47 IST

पाठविणाऱ्याचे नाव, गाव सगळंच बीड पोलिसांनी लपवलं

सोमनाथ खताळ

बीड : मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणातील फरार तीन आरोपींचे मृतदेह सापडल्याचा व्हाईस मेसेज अज्ञात व्यक्तीने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना पाठविला होता. त्याची माध्यमांनाही माहिती दिल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर बीडपोलिसांची याचा तपास केला असता, संबंधिताने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. तर दमानिया यांनाही यासंदर्भात बीड पोलिसांनी नोटीस बजावली आहे. दरम्यान, पोलिसांनी मेसेज पाठविणाऱ्याचे नाव, तो कुठला आहे किंवा कारवाई काय केली, याची माहिती न दिल्याने संशय व्यक्त होत आहे. 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींच्या अटकेसाठी शनिवारी बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. त्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या देखील बीडमध्ये आल्या होत्या. त्यांनी आपल्या मोबाईलवर एका व्यक्तीने व्हाईस मेसेज पाठवून या प्रकरणातील तीनही आरोपींचे मृतदेह बश्वेश्वर कल्याणला सापडल्या आहेत, अशी माहिती दिली होती. ही माहिती त्यांनी बीड पोलिसांना दिली. त्यानंतर याचा शोध पोलिसांनी घेतला असता दारूच्या नशेत एका व्यक्तीने हे कृत्य केल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला. तर दमानिया यांनाही याबाबत नोटिस देण्यात आली.

पोलिसांची कारवाई संशयाच्या भोवऱ्यातराज्यभरात गाजलेल्या या गंभीर प्रकरणात दमानिया यांनी मृतदेह सापडल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर रविवारी पोलिसांनी यातील संबंधित व्यक्तीचा शोध घेतल्याचे सांगितले. परंतू तो व्यक्ती कोण आहे? त्याच्यावर काय कारवाई केली? त्याने हे कृत्य का केले? दमानिया यांनाच का व्हाईस मेसेज पाठवला? यासारख्या कोणत्याच प्रश्नाचा खुलासा पोलिसांनी केला नाही. त्यामुळे ही कारवाईच संशयाच्या भोवऱ्यात आहे. नाव नाही, किमान तो व्यक्ती कुठला आहे? याचीही माहिती बीड पोलिसांनी दिली नाही. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांना संपर्क केला, परंतू त्यांनी फोन घेतला नाही.

कारवाई झाली आहे. तो व्यक्ती कोण? त्याचे नाव काय ? हे तुम्हाला देता येत नाही.- उस्मान शेख, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड

पोलिस आणि क्राईमला एकमेकांचा ताळमेळ नसेल. कारण मला जी माहिती होती ती एसपींना दिली होती. मला जे पत्र आले आहे ते क्राईम ब्रांचकडून आले आहे. क्राईम ब्रांच काय आणि सीआयडी काय, ज्यांना माहिती हवी, त्यांना द्यायला तयार आहे. मुख्य मुद्दा हा आहे की ते झाले की नाही, हे शोधणे पोलिसांचे काम आहे. यासंदर्भात मी पोलिस अधीक्षकांना मेसेज पाठवला आहे. त्यांचा वेळ मिळाला की भेट घेणार आहे.- अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीkaij-acकेजPoliceपोलिस