शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

काकाला पुतण्या ठरला ‘भारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:47 AM

. नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर गटाचा उमेदवार अपक्ष रिंगणात उतरला होता. त्यांचा पराभव करून संदीप क्षीरसागर हा पुतण्या नगराध्यक्ष डॉ.क्षीरसागर या काकाला भारी ठरल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड नगर पालिकेच्या प्रभाग क्र.११ अ मधील पोटनिवडणूकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार आणि संदीप क्षीरसागर गटाच्या मोमीन खमरून्निसा शरीफोद्दीन या ३१५ मतांनी विजयी झाल्या. नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर गटाचा उमेदवार अपक्ष रिंगणात उतरला होता. त्यांचा पराभव करून संदीप क्षीरसागर हा पुतण्या नगराध्यक्ष डॉ.क्षीरसागर या काकाला भारी ठरल्याचे दिसून आले.तीन अपत्य असल्याच्या कारणावरून तत्कालीन नगरसेविका अर्शिया सईद चाऊस यांना अपात्र ठरविले होते. त्यानंतर प्रभाग क्र.११ अ साठी पोटनिवडणूक घेण्याचे आदेश झाले. त्याप्रमाणे रविवारी दोन मतदान केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर सोमवारी सकाळीच मतमोजणी सुरू झाली. सुरूवातीपासूनच मोमीन खमरून्निसा शरीफोद्दीन या आघाडीवर होत्या. शेवटच्या राऊंडपर्यंत त्यांनी आघाडी कायम ठेवत ३१५ मतांनी विजय मिळविला. विजयाची बातमी समजताच राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नगरपालिकेसमोर गुलालाची उधळण केली. संदीप क्षीरसागर, उमेदवाराला खांद्यावर घेऊन राष्ट्रवादी भवनापर्यंत ढोलताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.काका-पुतण्याची टक्करनगर पालिका निवडणूकीत काका डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांना मात देत संदीप क्षीरसागर यांच्या काकू-नाना आघाडीने सत्ता स्थापन केली होती. नंतर एमआयएमचे नगरसेवक फुटल्याने सत्ता परिवर्तन झाले. आता पुन्हा एकदा संदीप यांनी काका डॉ.क्षीरसागर यांना मात दिली आहे. प्रत्येक निवडणूकीत संदीप क्षीरसागर आता काकाला काट्याची टक्कर देत असल्याचे दिसून येत आहे.जागा कायम ठेवण्यात यशअपात्र ठरलेल्या अर्शिया चाऊस या सुद्धा काकू-नाना आघाडीच्या उमेदवार होत्या. आता पुन्हा संदीप क्षीरसागर यांचाच उमेदवार विजयी झाल्याने त्यांना ही जागा कायम ठेवण्यात यश मिळाले.

टॅग्स :ElectionनिवडणूकBharat Bhushan Kshirsagarभारतभूषण क्षीरसागरPoliticsराजकारण