शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश
2
"भाजपाने सत्तेसाठी इतरांची सरकारं पाडली, कुटुंबांमध्ये भांडणं लावली"; अखिलेश यादवांची टीका
3
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अंतरवाली सराटीतूनच विरोध, गावकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र 
4
हिमाचल प्रदेशमध्ये ३ अपक्ष आमदारांचा राजीनामा मंजूर, आता या मतदारसंघात होणार पोटनिवडणूक
5
निकालाआधीच दिल्लीत हालचालींना वेग! नितीश कुमार यांनी पीएम मोदींची घेतली भेट, अमित शहा यांचीही भेट घेणार
6
शिवसेना तोडली, पण उद्धव ठाकरेंना संपवू शकले नाहीत; महाराष्ट्राचा एक्झिट पोल, भाजपाला सतावणारा
7
सर्वांनी माघार घेतली तर उमेदवार-नोटामध्ये निवडणूक का नाही? आयुक्त राजीव कुमारांनी केले स्पष्ट
8
Lipi Rastogi Suicide Note : मुंबईत आयएएस दाम्पत्याच्या मुलीची आत्महत्या, 'सुसाइड नोट'मध्ये काय? आलं समोर...
9
"आश्वासक बदल दिसला नाहीतर मी..."; CM शिंदेंचा उल्लेख करत शरद पवारांचा सरकारला इशारा
10
"कोणी केले सांगा, आम्ही त्यांना शिक्षा देऊ"; अमित शाह यांनी धमकावल्याच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
11
भारतातल्या पहिल्या निवडणुकीच्या मास्टरमाईंडवर येतोय सिनेमा, विद्या बालनच्या पतीची मोठी घोषणा
12
विजयापूर्वीच जल्लोषाची तयारी, पंतप्रधानांच्या निवासस्थानापासून भाजपा कार्यालयापर्यत होणार रोड शो  
13
पॉवर शेअर चमकला, सरकारचा आहे ५१ टक्के हिस्सा; १३ एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी करा, भाव वाढणार..."
14
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पुढील लोकसभा निवडणूक एप्रिलमध्येच संपविणार
15
“आमच्या नादाला लागू नका, उद्धव ठाकरे हे...”; रवी राणांच्या दाव्यावर संजय राऊतांचा पलटवार
16
"हातकणंगलेमधून मीच निवडून येणार"; निकालाआधीच राजू शेट्टींनी थेट लीडच सांगितलं
17
T20 World Cup मधील सर्वात तरूण आणि वयस्कर खेळाडू कोण? तब्बल २५ वर्षांचे अंतर
18
प्रेरणादायी! इंजिनिअर झाला वेटर, विकली चित्रपटाची तिकिटं; ६ वेळा नापास, ७ व्या प्रयत्नात IRS
19
Akasa Air च्या दिल्ली-मुंबई विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; अहमदाबादेत ईमर्जन्सी लँडिंग
20
Exit Poll मध्ये भाजप्रणित एनडीएला बहुमत; गुंतवणूकदारांच्या उड्या, Adani च्या शेअर्समध्ये तुफान तेजी

जादूटोणा करत मुलीच्या स्मरणार्थ उभारली समाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:05 AM

तालुक्यातील सूर्यमंदिर संस्थानवर एका भोंदू बाबाने मुलीच्या स्मरणार्थ जादूटोणा करत समाधी उभारली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी ही समाधी उद्ध्वस्त केली. दरम्यान पोलीस वेळीच पोहचल्याने गावातील तणाव नियंत्रणात आला.

ठळक मुद्देसूर्यमंदिर संस्थान परिसरातील प्रकार : संतप्त ग्रामस्थांकडून समाधी उद्ध्वस्त, पोलिसांच्या मध्यस्थीने तणाव निवळला

विष्णू गायकवाड ।लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : तालुक्यातील सूर्यमंदिर संस्थानवर एका भोंदू बाबाने मुलीच्या स्मरणार्थ जादूटोणा करत समाधी उभारली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी ही समाधी उद्ध्वस्त केली. दरम्यान पोलीस वेळीच पोहचल्याने गावातील तणाव नियंत्रणात आला.गेवराई तालुक्यातील कोळगाव येथून दोन किलोमीटर अंतरावर कल्याण ते विशाखापट्टणम महामार्गावर सूर्यमंदिर संस्थान आहे. या संस्थानवर हजारो भाविकांची श्रद्धा आहे.येथून जवळच असलेल्या साठेवाडी येथील सुरेश महाराज धोत्रे यांनी जादूटोणा करीत मयत मुलीचे हाड, बांगड्या, चपला, केस, लिंबू, साडी, चोळी, हळद, कुंकू आदी साहित्य पुरुन रातोरात तेथे समाधी उभारल्याचे शुक्रवारी ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी हा प्रकार हाणून पाडत समाधी उद्ध्वस्त केली.या जादूटोणा प्रकारामुळे सुर्यमंदिर संस्थानवर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. ही माहिती मिळताच चकलांबा ठाण्याचे सपोनि विजय देशमुख यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. संतप्त ग्रामस्थांना शांततेचे अवाहन करत दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत झाली.समाधी उकरल्याने संशय खरा ठरला : लिंबू, बांगड्या आढळल्यासुरेश महाराज धोत्रे यांनी दोन वर्षांपूर्वी मयत झालेल्या त्यांच्या मुलीचे हाड, चपला, बांगड्या, साडी, पीस, हळद-कुंकू, लिंबू आदी साहित्य पुरुन सूर्यमंदिर संस्थानवरील मंदिरासमोरच ही समाधी उभारली होती.ही माहिती एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितल्याने ग्रामस्थांना जादूटोण्याचा संशय आला.सुरेश महाराज धोत्रे ३०-३५ वर्षांपासून जादूटोणा करत असल्याने संशय अधिकच बळावला. पोलिसांसमक्ष समाधीस्थळ उकरल्याने हा संशय खरा ठरला.पोलीस वेळेवर आले नसते तर गावातील तणावामध्ये भर पडली असती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी