शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

संत एकनाथांच्या पालखी सोहळ्याची वाट खडतरच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 05:43 IST

शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या पालखी मार्ग असलेला पैठण - पंढरपूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून विकसित केला जात असला तर पारंपरिक गावांना वगळून महामार्ग तयार होत आहे.

पाटोदा (जि. बीड) : शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या पालखी मार्ग असलेला पैठण - पंढरपूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून विकसित केला जात असला तर पारंपरिक गावांना वगळून महामार्ग तयार होत आहे. पालखी मात्र पारंपरिक मार्गावरूनच जाणार असल्याने वारकऱ्यांची वाट ‘खडतर’ असणार आहे. २० वर्षांपूर्वी केलेल्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे वेगळी वाट निर्माण झाली आहे.तत्कालीन युती सरकारच्या काळात राज्यातील पालखी रस्ते राज्य महामार्ग म्हणून विकसित करण्याचा निर्णय झाला. हे सरकार असतानाच्या काळात झालेल्या कामानंतर रस्ते अर्धवट राहिले. त्यात पैठण-पंढरपूर रस्त्याचे कामही रखडले. तीन वर्षांपूर्वी राज्यातआणि केंद्रातही भाजपा मित्र पक्षांचे सरकार अस्तित्वात आले. केंद्रीयरस्ते विकास व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी सर्वच पालखी रस्त्यांना राष्ट्रीय महामार्ग म्हणून मान्यता दिली. मोठ्या स्वरूपात निधीही दिला. सध्या पैठण - पंढरपूर मार्गाचे काम अतिशय वेगाने सुरू आहे.प्रशासकीय यंत्रणेने संबंधितांना विश्वासात न घेताच सर्वेक्षण केले. त्यामध्ये शिरूर आणि पाटोदा तालुक्यातील पालखी मार्गच बदलून टाकला. नाथांची पालखी पैठण - चनकवाडी - पाटेगाव - दादेगाव - मुंगी - हदगाव - बोधेगाव - बालमटाकळी - वाडगव्हाण - शेकटे - कुंडल पारगाव - भगवानगड - माळेगाव - मुंगसवाडे - दहिवडी - शिरूर कासार - कान्होबाचीवाडी -कोळवाडी -राक्षसभुवन -विघनवाडी -खोल्याचीवाडी - डोळ्याची वाडी - सांगळवाडी -डिसलेवाडी - रायमोहा - धनगरवाडी - हाटकरवाडी - महेंद्रवाडी - गारमाथा -उंबरविहिरा - तांबाराजुरी - पाटोदा - पारगाव घुमरा - अनपटवाडी - डिघोळ -मोहरी मार्गे खर्डा आणि पुढे पंढरपूरला जाते.सर्वेक्षण करणाºया यंत्रणेने शिरूर आणि पाटोदा तालुक्यातील सर्वेक्षणच चुकीचे केले. यामध्ये शिरूर - राक्षसभुवन - विघनवाडी येथून पुढे रस्ता कारेगाव - डोंगरकिन्ही - चुंबळी - कडे वळवला. आता राष्ट्रीय महामार्ग असाच बांधला जात आहे. वास्तविक पारंपारिक पालखी मार्ग खोल्याची वाडी येथून डोळ्याची वाडी - सांगळवाडी - डिसलेवाडी - रायमोहा - धनगरवाडी - हटकरवाडी -महेंद्रवाडी - गारमाथा - उंबरविहिरा - तांबाराजुरी - पाटोदा असा आहे. सध्या होत असलेल्या आणि पारंपरिक मार्गात सुमारे २० किमीचा मार्गच बदलला आहे.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा