कडा बाजार समितीची सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:22 IST2021-01-01T04:22:44+5:302021-01-01T04:22:44+5:30

कडा : दरवर्षी एक दोन ठिकाणी व्यापाऱ्यां आडतीवर येणारा कापूस ट्रकमध्ये भरला जातो. या दरम्यान विद्युत वाहिनीच्या तारा लागुनच ...

The safety of the edge market committee is in the air | कडा बाजार समितीची सुरक्षा वाऱ्यावर

कडा बाजार समितीची सुरक्षा वाऱ्यावर

कडा : दरवर्षी एक दोन ठिकाणी व्यापाऱ्यां आडतीवर येणारा कापूस ट्रकमध्ये भरला जातो. या दरम्यान विद्युत वाहिनीच्या तारा लागुनच असल्याने आगीच्या घटना घडुन लाखोंचे नुकसान होत आहे. पण याकडे बाजार समितीचे दुर्लक्ष असुन व्यापाऱ्यांसह बाजार समितीची सुरक्षा वाऱ्यार असल्याचे दिसून येत आहे. अनेक वेळा आगीच्या घटना घडुनही अग्निशमन बंब मिळत नसल्याने भविष्यात मोठी दुर्दैवी घटना घडली तर जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आष्टी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून कडा कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाहिले जाते. या बाजार समिती मध्ये परजिल्हातूनही आवक असते. तसेच परदेशातही मालाची विक्री होते. याठिकाणी ग्रामीण भागातील शेतकरी आपला पिकवलेला कापूस आणतात व्यापारी याच्या आडतीवर घालतात. पण जेव्हा हेच व्यापारी ट्रक भरतात तेव्हा तेथे विद्युत वाहिनीच्या तारा गेल्याने याची स्पार्किंग होऊन आगीची दुर्घटना घडते. यात व्यापारी लोकांचे लाखोचे नुकसान होत आहे. दरवर्षी एक दोन घटना येथे घडतात. अशा घटनांतून बाजार समितीने धडा घ्यायला पाहिजे. पण व्यापारी लोंकाकडून ठरलेले भाडे करारावर मोबदला घेणारी बाजार समिती सुविधा देण्यात अपुरी पडत असल्याचे दिसत आहे. येथे महिन्याकाठी लाखोंची उलाढाल होते. मग गरजेचे असलेली अग्निशमन बंबाची व्यवस्था का उपलब्ध केली जात नाही? असा सवाल व्यापारी, शेतकरी तसेच नागरीक करीत आहेत. बाजार समितीने शेतमाल, व्यापारी मालाच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाय करण्याची मागणी शिवसंग्रामचे आष्टी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली आहे.

विद्युत वाहिनीच्या तारा झाडाझुडपात आणि ठिक ठिकाणी संरक्षण पाईप नसल्याने अचानक स्पार्किंग होऊन आग लागते. भविष्यात हमालांसह संबंधितांच्या जिवाला काही बरेवाईट झाले तर जबाबदारी कोणाची असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब जगताप यांनी उपस्थित केला आहे.

याबाबत कडा कृ.उ.बा समितीचे सभापती दत्तात्रय जेवे यांना विचारणा केली असता मागचे काही माहित नाही. आ. सुरेश धस यांच्याशी बोलून संचालक मंडळाची बैठक घेऊन लवकरच प्रस्ताव पाठवला जाईल असे त्यांनी लोकमतला सांगितले.

Web Title: The safety of the edge market committee is in the air