शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर अफवा; पोलिसांकडून कारवाई सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 00:19 IST

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा ठरणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावरून व्हायरल करणाऱ्यांवर बीड पोलिसांनी कारवायांचा बडगा उगारला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा ठरणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावरून व्हायरल करणाऱ्यांवर बीड पोलिसांनी कारवायांचा बडगा उगारला आहे. अवघ्या १२ तासांत १० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असून आणखी ५० च्यावर लोकांची यादी तयार केली असून त्यांच्यावरही कारवाई केली जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात भाजप, काँग्रेस कार्यकर्त्यांत वाद झाला होता. या घटनेत अनेकांनी वादग्रस्त पोस्ट टाकल्या. तसेच शुक्रवारी केज तालुक्यातील धर्माळा येथे लोकसभा निवडणूक उमेदवाराच्या पत्नीवर कोयत्याने हल्ला झाल्याची अफवा पसरवली. याचे पडसाद जिल्ह्यात उमटले. सोशल मीडियावरून टीका व अपशब्द वापरून खालच्या स्तराचे राजकारण झाले. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.हाच धागा पकडून पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी सायबर सेलमध्ये विशेष विभाग स्थापन केला. ७०३०००८१०० या क्रमांकावर आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यासंदर्भात आवाहन केले.नाव गोपनीय ठेवण्याची हमी दिली. त्यामुळे अवघ्या १२ तासांत तक्रारींचा ढिगारा साचला. अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपअधीक्षक रोशन पंडित स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांनी आलेल्या तक्रारींची शहानिशा केली.पोस्ट टाकणा-यांचा पत्ता आणि संपर्क क्रमांक मिळविले.या सर्वांवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या.पत्ता शोधताना दमछाकसोशल मीडियावर पोस्ट टाकल्याचे दिसून येते. मात्र संबंधिताचा शोध घेऊन त्याच्याशी संपर्क करताना पोलिसांना कसरत करावी लागत आहे. विशेष पथक यासाठी काम करू लागले आहे. शोध घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जात आहेत.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाCrime Newsगुन्हेगारीBeed policeबीड पोलीस